Download App

पवारांना मगरपट्टा, बारामती अन् लवासाचे पंतप्रधान करा; पडळकरांकडून राष्ट्रवादीचं खातेवाटप

  • Written By: Last Updated:

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जहरी टीका केली आहे. पवारांच्या पक्षामध्ये मुख्यमंत्री पदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. कशात काही नाही आणि हे मात्र मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहत आहेत. यावेळी ते इंदापूर येथे बोलत होते.

ज्यांचे चार खासदार आहेत त्यांना सगळे राष्ट्रीय नेते म्हणतात. त्यांच्यानंतर मायावती आल्या, ममता बॅनर्जी आल्या एवढेच नाही तर अण्णा हजारेंच्या आंदोलनात नाचून केजरीवाल तीन वेळा मुख्यमंत्री झाले पण यांना 100च्यावर आमदार नेता आले नाही, असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

Amol Kolhe : अखेर चॅलेंज पूर्ण, अमोल कोल्हेंनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

यांच्यापक्षामध्ये मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु आहे. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील, अजित पवार व सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले होते. त्यामुळे मी अशी विनंती करतो की,  बारामतीचे मुख्यमंत्री अजित पवारांना केले पाहिजे, लवासाचे मुख्यमंत्री सुप्रिया सुळेंना करा व मगरपट्ट्याचे मुख्यमंत्री जयंत पाटील यांना करा व या तीन राज्याचा एक देश करुन याचे  पंतप्रधान शरद पवार यांना करा अशी मी मोदी साहेबांना विनंती करणार आहे, असा खोचक टोला त्यांनी पवारांना लगावला आहे.

सोमय्यांनी केला 12 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, राज्यपालांनी दिला ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ पुरस्कार

तसेच ज्यापार्टीचा 1999 पासून एकच अध्यक्ष आहे ते म्हणत आहे की भारतात लोकशाही नाही. लोकशाही जर मजबूत करायची असेल तर ती फक्त भारतीय जनता पक्षच करु शकतो. तसेच ज्यावेळेला रशिया-युक्रेनचे युद्ध चालू होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी फोन आला. पण इकडे टीव्ही सिरीअलवाल्या बायकांचे भांडण मिटवण्यासाठी शरद पवारांना फोन येतो, असा टोला त्यांनी पवारांना लगावला आहे.

 

Tags

follow us