Nilesh Rane : आदित्यचं लग्न होत नाही, जनता बदला घेईल; राणेंनी पुन्हा डिवचले

Nilesh Rane Slams Uddhav Thackeray :  भाजप ( BJP )  नेते निलेश राणे ( Nilesh Rane )  यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) व आदित्य ठाकरे यांना डिवचले आहे. निलेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव असून सध्या ते महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सचिव आहेत. निलेश राणे हे उद्धव ठाकरे […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 13T110728.986

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 13T110728.986

Nilesh Rane Slams Uddhav Thackeray :  भाजप ( BJP )  नेते निलेश राणे ( Nilesh Rane )  यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) व आदित्य ठाकरे यांना डिवचले आहे. निलेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव असून सध्या ते महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सचिव आहेत. निलेश राणे हे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर कायम सोशल मीडियातून टीका करत असतात. आता त्यांनी पुन्हा एक ट्विट करत ठाकरेंना लक्ष केले आहे.

निलेश राणे यांनी टीका करताना उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यांचा आधार घेतला आहे. उद्धव  ठाकरे आपल्या भाषणात बोलताना जनता बदला घेईल, असे वाक्य वापरत असतात. त्यावरुनच राणेंनी ठाकरेंना लक्ष केले आहे. मुख्यमंत्री पद गेलं – जनता बदला घेईल, पक्ष आणि चिन्ह गेलं – जनता बदला घेईल, शाखेमध्ये घुसाल तर – जनता बदला घेईल, अशी वक्तव्ये उद्धव ठाकरे करत असतात, असे राणे म्हणाले आहेत. तसेच भाई तू स्वतः काय करणार की नाही?? उद्या म्हणाल आदित्यचं लग्न होत नाही, जनता बदला घेईल, असे म्हणत त्यांनी ठाकरेंना पुन्हा डिवचले आहे.

आमदार राहुल कुल हे राऊत यांच्या कोंडीत : 500 कोटींचे मनी लॉन्डरिंग

निलेश राणे यांनी याआधी देखील अनेकवेळा ट्विट करत व आपल्या जाहीर भाषणांमधून ठाकरेंना लक्ष केले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेतल्यानंतर शिंदे गट व ठाकरे गट यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष पहायला मिळतो आहे. उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा शिंदे गटावर टीका करताना या सगळ्याचा जनता बदला घेईल, असे म्हटले आहे.

काही दिवासांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे विधानभवन परिसरात आले होते. तेव्हा त्यांनी देखील माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. मी व एकनाथ शिंदे यांनी अनेकवेळा मातोश्रीवर खोके दिले आहेत, असे ते म्हणाले होते.

‘नॉट रिचेबल’ हसन मुश्रीफ आज ईडी कार्यालयात हजर राहणार का?

Exit mobile version