Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख धकेला आहे. हे लोक संविधान न मानणारे आहेत. यांनी जर संविधान मानले असते तर मागील अडीच वर्षात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदू वर अन्याय झाला नसता, हिंदूंच्या देवी-देवतांवर, उत्सवांवर रोख लागले नसते. उद्धव ठाकरे यांचं धर्मांतर झालं आहे. लव्ह जिहाद झाला आहे. 2019 ला यांना खुर्ची देताना यांचा सुंता करून टाकला आहे असे म्हणत त्यांनी ठाकरेंना लक्ष केले आहे.
जर ही मंडळी संविधानाला मानत असती तर रझा अकॅडमी व पीएफआय सारख्या संघटनांना पाठीशी घातले नसते. मुंबईचे तत्कालीन सी. पी. संजय पांडे तेव्हा उद्धव ठाकरे यांचे जावई असल्यासारखे फिरत होते. हे लोक संविधान मानतच नाही यांना शरियत कायदा पाहिजे, अशी टीका सदाभाऊंनी केली आहे.
LPG Price : आनंदाची बातमी! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 171 रुपयांनी कपात
यावेळी त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे काँग्रेसवर टीका करतानाचे भाषण ऐकवले. याचे कारण संजय राऊत यांनी प्रियंका गांधी यांनी ट्विट केलेला एक व्हिडिओ रिट्विट केला आहे. या व्हिडिओत मोदींच्या भाषणाची चूक काढली आहे. यावर बाळासाहेब ठाकरे यांचा भाषणाचा दाखला देत राणेंनी राऊतांना सुनावले आहे.
तसेच काल उद्धव ठाकरे हे मुंबईतील हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. यावर राणेंनी टोला लगावला आहे. मुंबई महापालिकेतील प्रशासनाने ती सर्व जागा गोमूत्रांनी धुवून घ्यावी असे ते म्हणाले आहेत. तसेच संजय राऊत यांनी आजचा सामनाच्या अग्रलेखामध्ये अमित शाह यांच्यावरती टीका केली आहे, यावर देखील राणेंनी उत्तर दिले आहे.
Sanjay Shirsat : वज्रमुठ सभेत अजित पवार फक्त शरीराने, त्यांच्या मनात काय ते 2-3 दिवसांत कळेल
अमित शाह मुंबईत आल्यावर मुंबईकरांना धडकी भरली पाहिजे. हे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र आहे, असे राऊतांनी सामनाच्या अग्रलेखांमध्ये म्हटले आहे. यावर राणेंनी निशाणा साधला आहे. मुंबई म्हणजे आदित्यच्या मित्राची पॅन्ट नाही जी पडेल. शाह या आडनावाची तुम्हाला एलर्जी आहे. हे आडनाव तुम्हाला चालत नाही. पण गुजराती माणसांचा पैसा मात्र ठाकरेंना चालतो. हे ठाकरे ज्यावेळी परदेशात फिरायला जातात त्यावेळी यांचा खर्च कोण करतं. प्रवासाच्या तिकिटापासून, हॉटेलचा खर्च, शॉपिंगचा खर्च हे सगळं मुंबईचे बिल्डर करतात, असा आरोप राणेंनी केला आहे.