‘फडणवीस हे आता प्रिन्सिपॉल आहेत’; पवारांच्या टीकेवर राणेंचा खोचक टोला

Nitesh Rane On Sharad Pawar :  भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. राज्यात दंगली घडविण्यामागे उद्धव ठाकरे असून त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी राणेंनी केली आहे. यावेळी ते रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत  बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात […]

Letsupp Image   2023 06 27T134239.905

Letsupp Image 2023 06 27T134239.905

Nitesh Rane On Sharad Pawar :  भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. राज्यात दंगली घडविण्यामागे उद्धव ठाकरे असून त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी राणेंनी केली आहे. यावेळी ते रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत  बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सुरु असलेल्या वादावर देखील भाष्य केले.

देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना, शरद पवारांनी केली ती मुत्सद्देगिरी आणि एकनाथ शिंदेंनी केली ती बेईमानी, असे कसे चालेल, असे म्हटले होते. त्यावर शरद पवारांनी मी सरकार स्थापन करताना फडणवीस हे प्राथमिक शाळेत असतील म्हटले होते. यावर नितेश राणेंनी बोलताना म्हटले, की फडणवीस हे तेव्हा प्राथमिक शाळेत असतील पण आता ते शाळेचे प्रिन्सिपॉल झाले आहे, असे म्हणत त्यांनी पवारांना टोला लगावला.

Bhagirath Bhalke : मोहोळच्या पोपटाला, भालके काय चीज ते उद्यापासून दाखवतो…!

दोन मोठी माणसं बोलत असताना मी बोलणं बरोबर नाही. पण फडणवीस जे प्रश्न विचारत आहे, त्याची थेट उत्तर मिळावी, असे आमची अपेक्षा आहे. फडणवीस हे तेव्हा प्राथमिक शाळेत असतील पण आता ते शाळेचे प्रिन्सिपॉल झाले आहे. त्यामुळे या अधिकराने  ते काही पॉइंटर प्रश्न विचारत असतील तर त्याची थेट उत्तर मिळावी, ही अपेक्षा आहे, असे राणे म्हणाले.

‘अशीच नौटंकी करत राहिलात तर तेलंगणा सुद्धा’… राऊतांचा पंढरपुरात आलेल्या ‘KCR’ना इशारा

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी 2014 ते 2019 मध्ये या काळात मातोश्री 2 ला परवानगी मिळवून घेतली. त्याच पद्धतीने मुंबईतील शाखा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना का नियमित करुन घेतल्या नाही, असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर प्रहार केला.

Exit mobile version