Download App

अजित पवार आमच्या बोकांडी बसले, त्यांना महायुतीतून बाहेर काढा…; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

अजित पवार आमच्या बोकांडी बसलेत. त्यांच्याकडून भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला जातोय, त्यामुळं त्यांना महायुतीतून बाहेर काढून टाका - चौधऱी

  • Written By: Last Updated:

Sudarshan Chaudhari On Ajit Pawar: शिंदे गट भाजपसोबत (BJP) गेल्यानंतर मागच्या वर्षी अजित पवारांनीही (Ajit Pawar) भाजपशी हातमिळवणी केली. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अजित पवारांना सरकारमध्ये सामील करून घेतल्याने विरोधी पक्षाने भाजपवर सातत्याने टीका केली. अशातच आता भाजपचे पणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी (Sudarshan Chaudhari) यांनी मोठं विधान केलं. अजित पवार आमच्या बोकांडी बसलेत. त्यांच्याकडून भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला जातोय, त्यामुळं त्यांना महायुतीतून बाहेर काढून टाकावं, अशी मागणी चौधरी यांनी केली.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये नोकरीची संधी, महिन्याला दोन लाख पगार, कोण करू शकतं अर्ज? 

राज्यात महायुतीचे सरकार असून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हे महायुतीचे घटक पक्ष आहे. लोकसभेतील धक्कादायक निकालानंतर आता दिवसेंदिवस राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या अडचणीत वाढ होत आहे. महायुतीमधूनच त्यांना आता विरोध होऊ लागला आहे. आज शिरूर लोकसभा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल उपस्थित होते. या बैठकीतच पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी आमदार कुल यांच्या समोरच अजितदादांकडून निधी वाटपामध्ये अन्याय केला जात असल्याचं म्हटलं.

आघाडीत ठिणगी! राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर थोरात, वडेट्टीवार, पाटलांचा आक्षेप 

भाजप पदाधिकाऱ्यांना त्यांच्याकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. अजित पवार जर सत्तेत असतील तर ती सत्ता देखील आम्हाला नको. कारण पुण्याचे पालकमंत्री म्हणून ते आता तर आमच्या बोकांडी बसले, अशा शब्दात चौधरी यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील आम्ही पक्षाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून सद्यपरिस्थितीची कल्पना दिल्याचं सांगितलं.

अजितदादांच्या राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. लोकसभेच्या वेळेस जेव्हा आम्ही त्यांच्या उमेदवारांसाठी मते मागायला गेलो, त्यावेळेस लोकांनी भाजपविषयीच नाराजी व्यक्त केली. आधी भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि आता अजित पवारांनी पुन्हा जवळ जवळ केलं, अशा शब्दात जनतेने नाराजी व्यक्त केल्याचं चौधरी म्हणाले.

अजितदादांच्या उमेदवाराविषयी मत मागायलाही लाज
येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका आहेत. मात्र अजित पवार हे महायुतीत असल्याने त्यांच्यामुळे आपल्याला फटका बसणार आहे. त्यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी मत मागायला गेलो, तरी लाज वाटते, अशा शब्दात चौधरी यांनी आपली खंत वरिष्ठांकडे व्यक्त केली.

follow us

वेब स्टोरीज