आघाडीत ठिणगी! राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर थोरात, वडेट्टीवार, पाटलांचा आक्षेप

आघाडीत ठिणगी! राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर थोरात, वडेट्टीवार, पाटलांचा आक्षेप

Maharashtra Politics : महाविकास आघाडी राज्यातील विधानसभा निवडणूक एकत्र (Maharashtra Politics) लढतील पण त्यांच्याकडून मुख्यमंत्रिपदासाठीचा उमेदवार जाहीर केला जाणार नाही. निवडणुकीनंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं प्लॅनिंग असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) मात्र विरोधी सूर आळवला आहे. विधानसभा निवडणुकीत राज्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावाच लागेल. बिनाचेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही असे संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संजय राऊतांच्या या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. राऊतांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

..त्यानंतर मोदी-शहा नितीश-नायडूंचे पक्ष फोडतील; राऊतांचा खळबळजनक दावा

मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत अजून आघाडीची कोणतीही बैठक झालेली नाही. त्यामुळे राऊत यांनी केलेल्या मागणीला सध्या काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पराभूत करणं जास्त महत्वाचं आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही नाराजी व्यक्त केली. निवडणुकीत महायुतीचा पराभव करणं हे आघाडीचं पहिलं उद्दीष्ट आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय घेऊ. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री कोण यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही असे पाटील म्हणाले.

यानंतर ठाकरे गटाचे आमदार आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, मुख्यमंत्री कोण होणार? हा विषय आमच्यासाठी महत्वाचा नाही. याबाबतचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेतला जाईल. यापेक्षा आम्हाला आगामी विधानसभा निवडणुकीत महायुताचा पराभव करणे जास्त महत्वाचे आहे, असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

काही लोकांना बांबूच लावला पाहिजे, CM शिंदेंचे संजय राऊतांवर टीकास्त्र

काय म्हणाले होते संजय राऊत ?

विधानसभा निवडणुकीत राज्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावाच लागेल. बिनाचेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही.मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावाच लागणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्याने उद्धव ठाकरेंचं नेतृत्व पाहिलं आहे असे राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांत अस्वस्थता पसरली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज