Download App

राज ठाकरेंना शपथविधीचं निमंत्रण का नाही? मुनगंटीवार म्हणाले, ‘घाईगडबडीत राहून गेलं…’

शपथविधीसाठी भाजपने सर्व मित्रपक्षांच्या प्रमुखांना आमंत्रित केलं होतं. मात्र राज ठाकरेंना निमंत्रणच मिळाले नसल्याची चर्चा आहे

  • Written By: Last Updated:

Sudhir Mungantiwar : लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर देशात एनडीएचे सरकार (NDA Govt) स्थापन झाले. रविवारी (दि. 9 जून) नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या शपथविधीसाठी भाजपने सर्व मित्रपक्षांच्या प्रमुखांना आमंत्रित केलं होतं. मात्र राज ठाकरेंना निमंत्रणच मिळाले नसल्याची चर्चा आहे. यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी स्पष्टीकरण दिलं.

Usha Kakade: करण जोहर, मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते उषा काकडे प्रॉडक्शन हाऊसच्या लोगाचे अनावरण 

मुनगंटीवार यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी राज ठाकरे यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण का नव्हतं? असा प्रश्न त्यांना विचारला असता घाईगडबडीने त्यांना निमंत्रण द्यायचं राहिलं असेल, असं मुनगंटीवार म्हणाले.

पुढं बोलतांना ते म्हणाले की, मी यासंदर्भात बाळा नांदगावकर यांच्याशी बोललो आहे. त्यांनी सांगितलं की, या सोहळ्याचं निमंत्रण नव्हतं. मी नक्कीच वरिष्ठांशी याबाबत चर्चा करेन. कदाचित घाईगडबडीत त्यांना निमंत्रण द्यायचं राहिलं असेल. मात्र, यामागे दुसरी कोणतीही भावना नाही. तसेच शपथविधीला येणाऱ्या पाहुण्यांचा यादी अधिकारी शिष्टाचारानुसार करतात, त्यामुळं कधी कधी जवळच्यांना निमंत्रण द्यायचं राहून जातं. मात्र, राज ठाकरे यांना निमंत्रण दिलेले नसेल, तर त्याची केंद्रीय नेतृत्वाने दखल घ्यावी, असं मुनगंटीवार म्हणाले.

‘Chandu Champion’ चा मोठा धमाका, रिलीजच्या अगोदरच कार्तिकच्या चित्रपटाने कमावले तब्बल इतके कोटी 

मैत्री जपणारी पिढी भाजपात नाही…
निमंत्रण न मिळाल्याने प्रकाश महाजन यांनी भाजपवर टीका केली. मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राबले. त्यामुळे एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी आम्हाला आमंत्रण मिळालं असतं तर आम्हाला आनंद झाला असता. पण, आता मैत्री जपणारी पिढी आता भाजपमध्ये संपलेली आहे, अशी टीका महाजन यांनी केली.

follow us