BJP Leader Vinod Tawde Criticized Rahul Gandhi : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी अकरा वाजता मुंबईत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची (Rahul Gandhi) पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींचं वक्तव्य ‘एक है तो सेफ है’ यावरून निशाणा साधला (Assembly Election 2024) होता. त्यांनी माध्यमांसमोर तिजोरी दाखवत अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी (Vinod Tawde) पत्रकार परिषद घेतली. त्यांनी ‘राहुल गांधी फेक है’ असे पोस्टर झळकवत माध्यमांसमोर महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय.
८४ वर्षांचा बाप आठवून कलाटेंनाच विधानसभेत पाठवा; कोल्हेंची चिंचडवकरांना भावनिक साद
राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर विनोद तावडे यांनी हल्लाबोल केलाय. यावेळी ते म्हणाले की, ‘एक है तो सेफ है’ याचा वेगळा अर्थ काढू नका. हा नारा सकारात्मक आहे. धारावीकरांना पक्कं घर मिळू नये, ही राहुल गांधी यांची इच्छा आहे. अदानी यांना राहुल गांधी यांना आणलं, अबु धाबीचा शेख असल्याची टीका देखील तावडेंनी केली. ‘एक है तो सेफ है, धारावी के लिये इतके मन मे शेख है’ असं आम्हाला वाटतं, असं घणाघात देखील विनोद तावडेंनी केलाय.
यावेळी विनोद तावडे म्हणाले की, महायुती सरकारच्या काळात एकही प्रकल्प राज्यबाहेर गेला नाही. उलट महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही प्रकल्प बाहेर गेले. राहुल गांधी यांनी सिद्ध करावे, आम्ही सिद्ध करू असं देखील ते म्हणाले आहेत. राज्यातील जनतेला फसवण्याचं काम करत आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस काळात अदानी यांना अनेक कामे दिलीत. उद्धव ठाकरे यांना प्रश्न, महाविकास आघाडी नेते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायला तयार नाही हे तुम्हाला माहिती का? असा सवाल देखील विनोद तावडे यांनी विचारला आहे.
मयत पोलीस शिपाई संदीप चौधरी यांच्या कुटुंबाला काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची सांत्वनपर भेट
अदानी यांची वाढ 2014 च्या अगोदर झाली, असं देखील ते म्हणाले आहेत. अदानी आणि कॉंग्रेसचं नातं खूप जुनं आहे. अदाणींचा खरा विकास कॉंग्रेसच्या काळात झालाय. त्यांची खरी प्रगती राजीव गांधी यांच्या काळात झालीय.
धारावीची जमिन अदानीला जाणार नाही. ज्याचं टेंडर त्यालाच जमिनी मिळणार आहे. धारावीत राहणाऱ्या सर्वांना घरं मिळणार, असं देखील विनोद तावडे माध्यमांसमोर म्हणाले आहेत. राहुल गांधी यांना धारावीकरांना झोप़डीतच ठेवायचं आहे, असा आरोप देखील विनोद तावडे यांनी केलाय. महाराष्ट्रात महायुतीच्या काळात सर्वाधिक गुंतवणूक झाल्याचं देखील तावडे म्हणाले आहेत.