Download App

विधानसभेलाही भाजप बॅकफूटवर? दोन आकडी जागांवरच यश मिळण्याचा अंतर्गत सर्व्हेत अंदाज

येत्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) भाजपला केवळ 55 ते 60 जागाच जिंकता येतील असा अंदाज अंतर्गत सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) दारुण पराभव झालेल्या भारतीय जनता पक्षाला (BJP) आगामी विधानसभा निवडणुकीतही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) भाजपला केवळ 55 ते 60 जागाच जिंकता येतील, असा निष्कर्ष पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणातून समोर आला आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले असल्याचे बोलले जाते, काही इंग्रजी वृत्तमाध्यमांनी यासंबंधिचे वृत्त दिले आहे. (BJP might win only 55 to 65 seats in the upcoming Maharashtra Assembly election)

गत दोन विधानसभा निवडणुकीत भाजपला 100 हून अधिक जागा जिंकण्यात यश आले आहे. 2014 मध्ये भाजपने स्वबळावर 122 जागा जिंकल्या होत्या. तर 2019 मध्ये युतीत 105 जागांवर यश मिळाले होते. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने राज्यातील लोकसभेच्या 23 जागा जिंकल्या होत्या. पण यंदा भाजपची लोकसभेत अत्यंत सुमार कामगिरी राहिली. भाजपने गत दोन्ही निवडणुकीपेक्षा यंदा जास्त जागा लढविल्या.

मोठी बातमी : छ.संभाजीनगर अन् धाराशिव नावं तशीचं राहणार; हस्तक्षेपास ‘सुप्रीम’ नकार

यंदा भाजपने 28 जागांवर उमेदवार उभे केले होते. पण यातील केवळ नऊ उमेदवारच निवडून आले.  तब्बल 19 उमेदवार पराभूत झाले. या धक्क्यातून सावरत भाजपने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये मोठ्या संख्यने उमेदवार पराभूत होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याच अंतर्गत सर्वेक्षणांनी भाजपची चिंता वाढवली आहे.

दिल्ली की महाराष्ट्र? गुगली प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं सेफ उत्तर, मी..,

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 164 मतदारसंघांमध्ये मोठे लीड मिळाले. तर महायुतीला 128 मतदारसंघांमध्येच आघाडी घेता आली. यानंतर महायुतीतील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपल्या आमदारांच्या कामगिरीचे गुप्तपणे सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणात जे आमदार निष्क्रिय ठरतील त्यांची तिकिटे विधानसभेला कापली जाणार आहेत. तसेच पर्यायी उमेदवारांचीही नावे काढली जात आहेत.

follow us