दिल्ली की महाराष्ट्र? गुगली प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं सेफ उत्तर, मी..,
Devendra fadnvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) केंद्रात जाणार असल्याचा दावा अनेक राजकीय नेत्यांकडून केला जातोयं. यामध्ये विरोधक नेत्यांपैकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील, असं भाकीत केलं होतं. पवारांपाठोपाठ काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनीही याला दुजोरा दिल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला पूर्णविरामच देऊन टाकलायं. मी इथेच असेन, असं एका वाक्यात सेफ उत्तर देवेंद्र फडणवीसांनी देत विरोधकांना चपराक मारल्याचं दिसून आलयं.
शेअर मार्केटमध्ये हाहाकार! उच्चांकानंतर सेन्सेक्स-निफ्टीची ‘आपटी’ने सुरुवात
लोकसभा निवडणुकीआधी राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं होतं. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं. मात्र, 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. यामागचा मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीसच असल्याचा दावा विरोधकांकडून केला गेला.
OBC आरक्षणातून अधिकारी झालेले पूजा खेडकरमुळे अडचणीत; कोर्टाचे महत्वपूर्ण आदेश
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील इतर 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून महायुतीत सामिल झाले. तर दुसऱ्याच वर्षी राष्ट्रवादीत अजित पवारांसह त्यांच्या समर्थकांनी बंडखोरी करीत एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीसांशी हातमिळवणी केली. यामागे देवेंद्र फडणवीसांचाच हात असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला मात्र, याला कुठलाही दुजोरा मिळाला नाही. अखेर देवेंद्र फडणवीसांनीच एका मुलाखतीत मी कार्यक्रम केला असल्याचं सांगितलं होतं.
महाराष्ट्र, हरियाणा अन् झारखंड.. चार राज्यांत काँग्रेसची हवा? सोनिया गांधींचा दाव्यात किती खरं..
एकूणच या संपूर्ण घडामोडींनंतर राज्यात शिंदे-फडणवीस-अजित पवारांचं सरकार स्थापन असून नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक महायुतीने एकत्रितपणे लढवली. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकही एकत्रितपणे लढवण्याबाबतचा दावा केला जात आहे. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मी इथेच असेन, असं सांगत फडणवीसांनी विरोधकांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.