Download App

शरद पवार हे मिनी औरंगजेब, त्यांनीच…; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब आहेत. आपल्या आयुष्यात शरद पवार फक्त दोनदा रायगडावर गेले आहेत.

  • Written By: Last Updated:

Gopichand Padalkar on Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) पुन्हा जहरी टीका केली. पडळकरांनी शरद पवारांना मिनी औरंगजेब (Aurangzeb)संबोधत जोरदार हल्लाबोल केला.

Maratha Reservation : शिंदे समितीचा तिसरा अहवाल, मराठा-कुणबीचे 54 लाख पुरावे समोर… 

शरद पवारांसमोर अहिल्यादेवीनगरचे नाव अहदमनगरच राहिले पाहिजे म्हणून घोषणाबाजी करण्यात आली होती, घोषणाबाजी करणाऱ्यांना पवारांमध्ये औरंगजेबाचे काही गुण दिसले असतील म्हणून त्यांच्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली, असा टोला पडळकारंनी लगावला.

गोपीचंद पडळकर म्हणाले, शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब आहेत. आपल्या आयुष्यात शरद पवार फक्त दोनदा रायगडावर गेले आहेत. ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरला गेले होते. ते गाडीतून उतरत असतांना त्यांच्यासमोर अहमदनगरचे नाव अहमदनगरच राहिले पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. अशा घोषणा देणारे कोण करत आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पडळकरांनी केली. शरद पवार यांनी धनगर समाजाचे वाटोळे केले, असा घणाघातही पडळकरांनी केली.

Daund Assembly Constituency : राहुल कुल यांचं टेन्शन वाढलं…दादांचा शिलेदार पवारांच्या गळाला? 

पुढं बोलतांना पडळकर म्हणाले, वर्षभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगरला अनेक नेते आले, कार्यक्रम झाले. तिथे कोणाीही मागणी केली नाही. शरद पवार गेल्यानंतरचते खऱ्या औरंग्याची पिल्ल का अशी मागणी करत आहे. शरद पवार राज्यातील मिनी औंरगजेब आहे, असं माझं म्हणणं आहे, असं पडळकर म्हणाले.

पुढे बोलतांना पडळकर म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोरगरिबांचे कवच कुंडल आहेत. फडणवीस यांनी शरद पवारांच्या दुकानाला कुलूप लावलेय म्हणून त्यांना लक्ष्य केलं जातं. शरद पवारांच्या 50 वर्षांच्या राजकारणात त्यांनी कधी 100 आमदारही निवडून आणले नाहीत. पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण काहीही बदललेले नाही. शरद पवार हे फुकटची हवा करता आहेत. त्यामुळे ओबीसी, भटक्या विमुक्त आणि गरीब मराठ्यांनी जागे व्हायला हवे असं आवाहन पडळकरांनी केलं.

follow us