Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी फक्त हिंदूसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव मानू नका, असं वक्तव्य केलं होत. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. पोलिसांना (Police) दिवसाची सुट्टी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा. हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवतो, त्यानंतचरी सकाळ कोणं बघतं, असं वक्तव्य त्यांनी केलं.
तिरुपतीच्या लाडूंमध्ये गोमांस? चंद्राबाबूंच्या आरोपांवर लॅबचा शिक्कामोर्तब, रिपोर्ट व्हायरल
नितेश राणे यांची आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चाची सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त विधान केलं. ते पोलिसांना उद्देशून म्हणाले की, तुम्हाला त्या जिहाद्यांना आवरायला जमत नसेल तर एक दिवस सुट्टी घ्या. त्या लोकांना साफ करायची जबाबदारी आमच्या लोकांची असेल.
पुढं ते म्हणाले, पुढच्या वेळी एकही लव्ह जिहादची केस तुमच्यासमोर आली तर आधी त्याला शोधा, त्याच्या तंगड्या तोडा, मला फोन करा. काहीही होणार नाही ही माझी जबाबदारी असेल, असं ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते तोंडावर पडले, महाराष्ट्राची बदनामी करायचे धंदे बंद करा; फडणवीसांचे टीकास्त्र
राणे म्हणाले की, या लोकांना काय वाटतं की ह्यांच्या धमक्यांना भीक घालणारे आम्ही लोकं आहोत. पोलिसांना एका दिवसाची सुट्टी देतो. तुम्ही तुमची ताकद दाखवा. हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानात उतरतो. आम्हालाही बघायचं की, त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात की, मुसलमान बघतात, असं आव्हान राणेंनी दिलं.
दरम्यान, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नितेश राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं
महायुतीची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
मी माझ्या धर्मासाठी लढतोय
दरम्यान, राणे यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माध्यमांनी विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, मी येथे आमदार किंवा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही तर हिंदू समाजाशी संवाद साधण्यासाठी हिंदू म्हणून आलो आहे. मी माझ्या धर्माचं काम करतो, आज आमच्या धर्माला आव्हानं दिलं जातंय. मिरवणुकीत देवी देवतांची विटंबना केली जाते. दगडं मारली जात आहेत. म्हणून हिंदू म्हणून मी माझी भूमिका मांडतोय. माझ्या धर्मासाठी लढतोय, असं राणे म्हणाले.