हाजी अराफत शेख यांच्याशी आमचे चांगले संबंध; ‘त्या’ वक्तव्याच्या वादावर नितेश राणेंचं पांघरुण
Nitesh Rane On Haji Arafat shaikh : भाजपचे नेते हाजी अराफत शेख (Haji Arafat shaikh) यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांशी आमचे चांगले संबंध असून आमचा वाद मिटला असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी वादावर पांघरुण घातलंय. दरम्यान, अहमदनगरमध्ये आयोजित मोर्चामध्ये नितेश राणेंनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. या प्रकरणी हाजी अराफत शेख यांनी नितेश राणेंना घरचा आहेर देत खुलं चॅलेंजच दिलं होतं. त्यानंतर आता राणेंनी आपली भूमिका मांडलीयं. यावेळी बोलताना राणेंनी विविध मुद्द्यांवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकेची तोफ डागलीयं.
‘TMKOC …’ मधील मस्तीखोर टप्पू दिसणार निगेटिव्ह भूमिकेत, मोठ्या ब्रेकनंतर इंडस्ट्रीत कमबॅक
नितेश राणे म्हणाले, हाजी अराफत यांना आम्ही चांगलं ओळखतो, त्यांच्या कुटुंबियांशी आमचे चांगले संबंध आहेत. साबीर शेख यांना ओळखणारे आम्ही आहोत, आमचा वाद मिटलेला असल्याचं नितेश राणेंनी यावेळी स्पष्ट केलंय.
काय म्हणाले होते हाजी अराफत शेख?
मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुर्ल्यामध्येच आहे, तू कधी येणार आहे वेळ व तारीख सांग. तू मस्जिदमध्ये घुसून मारण्याची भाषा करतो, ते सोड कुर्ल्याच्या मस्जिदमध्ये येऊन तर दाखव, अशा शब्दात हाजी अराफत शेख यांनी आमदार नितेश राणेंना इशारा दिला आहे. तसेच, यापुढे माझ्या धर्माबद्दल व धर्मगुरूबाबत बोलला तर याद राख, असेही शेख यांनी म्हटले होते.
केजरीवालांना जामीन मिळताच पवारांची सूचक पोस्ट; म्हणाले, एखाद्याला नामोहरम करण्याचा कट…
काँग्रेस सत्तेत आल्यास आरक्षण संपवणार :
आरक्षणाविरोधातील काँग्रेसचा चेहरा राहुल गांधी यांच्या मुखातून बाहेर आला आहे. काँग्रेसच्या विचाराचं सरकार ज्या दिवशी आलं, त्या दिवशी आरक्षणाबातची उलटी गिनती सुरु होईल, याची जाणीव जनतेने घ्यावी. देशात जोपर्यंत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार आहे, तोवर आरक्षणाच्या ढाच्याला कोणीही हात लावू शकत नाही. आरक्षणाकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, असं नितेश राणेंनी स्पष्ट केलंय.
तसेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी राहुल गांधीचं विधान मोडून तोडून दाखवलं आहे, पण राहुल गांधीची मुलाखत पूर्ण लोकांनी पाहिलीयं. जिथून राऊतला पॅकेज येतं तिथून नवीन बापाला संरक्षण देण्यापेक्षा त्यांनी स्विकारावं की काँग्रेस महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर आरक्षण संपवून टाकणार हे सत्य कोणीही पुसू शकत नाही, असंही राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, भाजप पक्षामध्ये अनेक राष्ट्रभक्त मुस्लिम आहेत, ते संविधानाला मानतात, तिरंग्याला सलाम करतात, वंदे मातरम म्हणतात,ते राष्ट्रभक्त आमचे आहेत, पण देशविरोधातील कारवाई बांग्लादेशी रोहिंग्या यांचा आमचा विरोध असणार आहे. संजय राऊतांनी आमची चिंता करु नकोस तूझं जे रक्त झालंयं हिरव ते बघ, असा टोला राणेंनी संजय राऊतांना लगावलायं.