Nitesh Rane On Udhav Thackeray : देवेंद्र फडणवीस हे पाव असो किंवा अर्धे असो पण तुला घरी बसवलं आहे, तुम्हाला पुरुन उरले असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा (Udhav Thackeray) एकेरी उल्लेख करीत प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा काल कोकण दौरा होता. या दौऱ्यात आयोजित सभेतून उद्धव ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावर बोलताना आता नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.
सत्तेतल्या नेत्यांना वाटतंय की आम्ही घाबरलोयं पण..,; ईडी चौकशीनंतरही रोहित पवारांचा तोरा कायम
नितेश राणे म्हणाले, देवेंद्र फडणवीस पाव उपमुख्यमंत्री असो की अर्धे असो पण तुला घरी बसवलं आहे. पुरुन उरलेले आहेत. तुम्हाला आता लाचारासारखं फिरायला लागत आहे. कधी नाही पण आता उद्धव ठाकरे कोकणात येत आहेत. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असतानाही कधी कोकणात आलेले नाहीत. उद्धव ठाकरेंनी 14 मिनिटे फक्त पाहणी दौरा केला होता. या सर्वांचा हिशोब आता कोकणातील जनता त्यांना मागत असल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
देवेंद्र फडणवीस अर्धा नव्हे, पाव मुख्यमंत्री झाले आहेत. भाजपने 2019 साली युती तोडली नसते तर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते, अशी टीका जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती.
उत्तर प्रदेशातही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष निनादणार! मुख्यमंत्री योगींनी काढलं पत्र
नाईंटी मारुन बोललं की असंच वाटतं..
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नाईंटी मारुन बोलायला लागले लोकांनी वाटतं की भाजप 400 जागांपेक्षा अधिक जागा जिंकल्या तर लोकशाही धोक्यात आहे. ईडीच्या कारवाई आणि ईव्हिएम मशीनमुळे लोकशाही धोक्यात आहे. युती होती तेव्हा याच ईव्हिएमुळे ठाकरे गटाचे खासदार निवडून आले होते. तेव्हा त्यांना काहीच वाटलं नाही. तेव्हा तुम्हाला चालतं पण आता मैदानात उतरण्याची वेळ आलीयं तर शेंबूड पुसत पुसत बोलत असल्याची सडकून टीका नितेश राणे यांनी संजय राऊतांवर केली आहे.