‘…म्हणजे राजकुंद्राने ब्लू फिल्म बनवल्यासारखंच’; राऊतांच्या टीकेवर नितेश राणेंचा पलटवार
Nitesh Rane On Sanjay Raut : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अपात्र आमदार प्रकरणावर निकाल दिल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टीकेवर भाजपचे आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) पलटवार केला आहे. लग्न एकदा झाल्यानंतर प्रत्येकवेळी सर्टिफिकेट दाखवावं लागतं का? असा टोला राऊतांनी लगावला त्यावर असं बोलणं म्हणजे राजकूंद्राने ब्लू फिल्म बनवल्यासारखंच असल्याचा पलटवार नितेश राणेंनी केला आहे. दरम्यान, नितेश राणेंच्या पलटवारानंतर राऊत गप्पगार झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेच्या ‘विश्वमित्र’ अल्बममधील टायटल सॉंगचा ट्रेलर रिलीज
कालच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत यांनी आज पुन्हा सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवल्याचं दिसून आलं आहे. संजय राऊत म्हणाले, लग्न एकदाच होत असतं, त्यामुळे प्रत्येक लग्नाच्या वाढदिवसाला सर्टिफिकेट दाखवावं लागत नाही. शिवसेना पक्षाच्या घटनेतील बदल वेळोवेळी आयोगाला कळवले होते. 1999 चीच घटना निवडणूक आयोगाकडे आहे. घटना एकदा दिल्यानंतर घटनेत होत असलेल्या बदलांची ठरावांची माहिती वेळोवेळी आपण निवडणूक आयोगाला कळवत असतो. त्याच्या पोहोचपावत्यादेखील काल आम्ही दाखवल्या आहेत. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन वकीलांनी एकत्र बसून काय ते एकदाचं ठरवावं, अशी टीका संजय राऊतांनी केली होती.
माझं पद अवैध होतं तर अमित शाहा मातोश्रीवर कशासाठी आले होते? उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
संजय राऊतांच्या टीकेवर नितेश राणे चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आले. ते म्हणाले, जेव्हा आदित्य ठाकरेंचं लग्न कराल, आता त्यांचं लग्न पुरुषाशी की महिलेचं हे मी विचारणार नाही पण जेव्हा होईल त्याला मॅरेज सर्टिफिकेट लागतं. संजय राऊतांनी लग्नावर बोलावं हे म्हणजे राजकुंद्राने ब्लू फिल्म कशी बनवल्यासारखंच असल्याचं प्रत्युत्तर नितेश राणेंनी दिलं आहे. तसेच पक्षांतरची सवय नार्वेकरांना असेल तर संजय राऊतांनाही घरं बदलण्याची सवय आहे, त्या सर्व घरांची पुराव्याची नोंदी मॅरेज कोर्टात करतोस का? असा एकेरी उल्लेख नितेश राणेंनी सवाल केलायं.
अपात्र आमदार प्रकरणी निकाल समोर आल्यानंतर ठाकरे गटाकडून काल मुंबईतील वरळीडोममध्ये जनता न्यायालयाचे आयोजन करण्यात आलं होतं. या जनता न्यायालयातच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेतून ठाकरे गटाच्या नेत्यांकडून राहुल नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड करण्यात आल्याचंच पाहायला मिळालं आहे. यावेळी शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेल्या बदलांच्या ठरावांचे व्हिडिओच दाखवण्यात आले आहेत. या ठरावादरम्यान, राहुल नार्वेकरदेखील उपस्थित असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे नार्वेकर ठरावादरम्यान उपस्थित असतानाही आमच्याकडे 2013 आणि 2018 च्या घटनादुरुस्तीचे पुरावे आले नसल्याचं नार्वेकरांनी निकाल देताना स्पष्ट केल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं होतं.