आदित्य ठाकरे एक शेंबड पोरगं, प्रविण दरेकरांनी कोणालाचं सोडलं नाही…

आदित्य ठाकरे एक शेंबड पोरगं आहे, त्याचं वय काय बोलतोय काय, मला तर आदित्य ठाकरेची कीव येते, या शब्दांत भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी ठाकरे गटाच्या सर्वच नेत्यांचा समाचार घेतला आहे. दरेकर आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. WC Qualifiers 2023: झिम्बाब्वेने रचला इतिहास, वनडेत 400 चा टप्पा पार; कर्णधार विलियम्सचे द्विशतक हुकले आमदार दरेकर […]

Pravind

Pravind

आदित्य ठाकरे एक शेंबड पोरगं आहे, त्याचं वय काय बोलतोय काय, मला तर आदित्य ठाकरेची कीव येते, या शब्दांत भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी ठाकरे गटाच्या सर्वच नेत्यांचा समाचार घेतला आहे. दरेकर आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

WC Qualifiers 2023: झिम्बाब्वेने रचला इतिहास, वनडेत 400 चा टप्पा पार; कर्णधार विलियम्सचे द्विशतक हुकले

आमदार दरेकर म्हणाले, ठाकरे गटाचे सर्वच नेते सध्या बेतालपणे विधाने करीत आहेत. त्यामध्ये विशेषत: संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत. काल तर आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला लाज वाटते काय? अरे तुझी उंची काय, तुझं वय काय, तू एक शेंबड पोरग, मला आदित्यची कीव येते या शब्दांत त्यांनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला आहे.

फडणवीस-ठाकरे पुन्हा भिडणार? शाखा पाडल्याच्या राड्यावरुन दोन्ही नेते आमने-सामने

तसेच यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या नाकाखालून चाळीस आमदार आणले आहेत, तेव्हा देवेंद्रजींची हिंमत तुम्हाला कळायला हवी होती, असं म्हणत त्यांनी ठाकरेंना फटकारलं आहे. तसेच मुंबई महापालिकेवर ठाकरेंची 25 वर्षे सत्ता होती. 25 वर्षांत ठाकरेंनी काय केलं ते आता कॅगच्या माध्यमातून बाहेर येणार आहे म्हणून उद्धव ठाकरे 1 जुलै रोजी मोर्चा काढून दिशाभूल प्रयत्न करत असल्याचं ते म्हणालेत.

दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना किती राज्यात किती लोकप्रियता मिळतेय, याचा पाढाच वाचून दाखवल्याचं दिसून आलं आहे.

Exit mobile version