Mumbai : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये भाजप ( BJP ) आमदार राम कदम ( Ram Kadam ) यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचे कारण त्यांनी त्यांच्या केस वाढवले आहेत व आपल्या शेंडीला गाठ मारली आहे. ही कोणतीही फॅशन नसून जोपर्यंत त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील एका भागात पाणी मिळणार नाही तोपर्यंत केस कापणार नाही, असे ते म्हणाले आहेत.
भाजप आमदार राम कदम हे मुंबईच्या घाटकोपर भागातून निवडून आलेले आहेत. घाटकोपर भागातील टेकडीवर पिण्याचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत केस कापणार नाही, असे ते म्हणाले आहेत. मुंबई महापालिकेने याकामासाठी अडवणूक केल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. तसेच पाणी माफियांमुळे ही योजना होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
https://letsupp.com/politics/nana-patole-i-am-nana-yes-no-grandfather-not-going-to-delhi-and-lobbying-24522.html
या कामासाठी मी आत्तापर्यंत अनेकांना भेटलो आहे. ही योजना व्हावी यासाठी आत्तापर्यंत अनेक बैठका झाल्या आहेत. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखी एक वर्ष लागणार आहे. जोपर्यंत या योजनेचे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत केस कापणार नसल्याचे राम कदम म्हणाले आहेत.
Nana Patole : अजित पवारांनी नेमका डोळा कुणाला मारला?; नाना पटोलेंनी दिलं उत्तर
दरम्यान, सध्या मुंबई महापालिकेमध्ये कोणत्याही पक्षाची सत्ता नाही. निवडणुका झालेल्या नसल्याने सध्या महापालिकेचा कारभार आयुक्त पाहत आहेत. आधी कोरोनामुळे व नंतर सर्वोच्च न्यायालयातील केसमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. परंतु आगामी दोन ते तीन महिन्यांमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे.