Download App

राष्ट्रवादीतली ‘मुन्नी’ ही महिला नसून पुरुष; सुरेश धसांचा रोख कुणाकडे?

राष्ट्रवादीतली मुन्नी ही महिला नसून पुरुष आहे, मुन्नीला एकदा बोलू द्या, मग मुन्नीचे सगळेच लफडे, सुफडे माझ्याकडे आहेत, असा इशारा भाजपचे आमदार सुरेश धसांनी दिलायं.

Mla Suresh Dhas : राष्ट्रवादीतली मुन्नी ही महिला नसून पुरुष आहे, मुन्नीला एकदा बोलू द्या, मग मुन्नीचे सगळेच लफडे, सुफडे माझ्याकडे आहेत, असा इशारा भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas)यांनी केलंय. मंत्रिपद न मिळाल्याने आमदार धस यांचा पोटशूळ उठत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली होती. सुरेश धस यांनी अमोल मिटकरी यांचं नाव घेतलं नाही मात्र त्यांच्याकडेच रोख असल्याचं दिसून आलं. धस यांनी मला अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यावर बोलायंच नाही, संतोष देशमुख प्रकरणावरील फोकस डायव्हर्ट करायचा नसल्याचं सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय.

“मंत्रिपद माझ्या नशिबात, मी शंभर टक्के मंत्री होणार”, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला फुल्ल कॉन्फिडन्स!

आमदार सुरेश धस म्हणाले, राष्ट्रवादीतली मुन्नी ही महिला नसून पुरुष आहे, मी जे बोललो आहे ते त्याला समजलं आहे. ती मुन्नी फक्त बाहेर आलेली नाही, मुन्नी अगोदरच बदनाम झालीयं डार्लिंग तेरे लिए, मुन्नीचे सगळे लफडे, सुफडे माझ्याकडे आहेत तिला एकदा बाहेर येऊ द्या, असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय.

वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर मोक्काची कारवाई होण्यासाठी तसे कारणे द्यावे लागतात. डीजीची परवानगी आल्यानंतर मोक्कांतर्गत कारवाई होणार आहे, कदाचित ते त्यासाठी थांबलं असावं. या प्रकरणी ईडीची कारवाई थांबलेली नसून जोरात सुरु होणार असल्याचंही सुरेश धस म्हणाले आहेत.

काँग्रेसला धक्का! दिल्लीत उद्धव ठाकरेंचा ‘आप’ला पाठिंबा; इंडिया आघाडीला तडे?

जिजाऊ मल्टिस्टेट, राजस्थानी मल्टिस्टेट बॅंक ‘आकां’मुळेच बुडाली…
अजितदादा आणि माझे वेगळे संबंध आहेत. ते महायुतीचे सरदार आहेत ते त्यांच्याकडे एकच हा विषय नाही. मी दुसरा विषय घेऊन गेलो होतो, ज्ञानराजा, जिजाऊ मल्टिस्टेट, राजस्थानी मल्टिस्टेटचं वाटोळं आका आणि त्यांच्या आकांनी केलंय, त्यांनी मिळून लोकांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं अन् नंतर बॅंक बुडाली म्हणून सांगितलं असल्याचं आमदार धस म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते आमदार अमोल मिटकरी?
धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याचं काम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. मंत्रिपद मिळालं नाही याचा पोटशूळ सुरेश धस यांच्या पोटात उठताना दिसत असल्याचं मिटकरी म्हणाले. धनंजय मुंडे यांच्या विरोधात आसूडापोटी सुरेश धस राजकारण करत असल्याचंही मिटकरी म्हणाले होते.

follow us