पुरावा लागत असेल तर घेऊन जा; खासदार विखेंनी लंकेंना सुनावले

Ahmednagar Politics: पारनेर तालुक्यातील रस्त्यांच्या कामाच्या निधीवरून खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यावरून दोघांमध्ये टीका सुरू झाली आहे. आता खासदार विखे यांनी लंके यांना चांगलेच सुनावले आहे. कामे मंजूर झाल्याचे हवेत बोलत नाही. पुरावा लागत असेल, तर घेऊन जा असे विखे हे लंकेंना […]

Sujay Vikhe

Sujay Vikhe

Ahmednagar Politics: पारनेर तालुक्यातील रस्त्यांच्या कामाच्या निधीवरून खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यावरून दोघांमध्ये टीका सुरू झाली आहे. आता खासदार विखे यांनी लंके यांना चांगलेच सुनावले आहे. कामे मंजूर झाल्याचे हवेत बोलत नाही. पुरावा लागत असेल, तर घेऊन जा असे विखे हे लंकेंना म्हणालेत.

पारनेर तालुक्यात रस्त्यांच्या कामासाठी मोठा निधी आणल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केला आहे. त्याला आता खासदार विखेंनी प्रत्युत्तर दिले आहे. मविआच्या लोकप्रतिनिधींना आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची सवय आहे. आम्ही पुराव्यानिशी बोलतो. आमच्याकडे कागद आहे. कोणत्या कामाला कुणाच्या विनंतीवरून निधी मिळाला आहे. कुणाला हे कागदपत्रे हवे असेल तर माझ्याकडून घेऊन जा, असे विखे म्हणाले.

भाजप-शिवसेना सरकार गेल्यानंतर तीन वर्षांत महाविकास आघाडीच्या नेत्यांना कामांचे नारळ फोडले आहे. हे कामे भाजपने मंजूर केली होती. ते कामाचे श्रेय तुम्ही घेत आहात. आताही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मंजूर केलेल्या कामाचे श्रेयही तुम्ही घेऊ लागला असल्याचे विखे म्हणाले.

मी पारनेरमध्ये पत्रकार परिषद घेऊन या कामाबाबत माहिती दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पत्रानेही कामे मंजूर झाली आहेत. भाजप व शिवसेनेच्या काही नेत्यांनी कामे मंजूर करून आणली आहेत. त्याचे श्रेयही महाविकास आघाडीचे आमदार घेऊ लागले आहे. श्रेय घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीकाही खासदार विखे यांनी केला आहे.

धमक्या अन् दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही, थोरातांचा विखेंना अल्टिमेटम

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार लंके आणि भाजपचे खासदार सुजय विखे यांच्यामध्ये जोरदार टीका-टिप्पणी होत आहेत. लंकेहे विखे यांना खुले आव्हान देत आहेत. आगामी काळातील निवडणुका बघता दोघांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेसाठी लंके हे उमेदवार असू शकतात, असे राजकीय चर्चा आहे. तर राष्ट्रवादीकडून लंके यांना चांगलीच बळ देण्यात येत आहे. त्यामुळे लंकेंसाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते पारनेरला नेहमीच येत आहत.

Exit mobile version