संजय राऊतांना लवकरच हॉस्पिटलमध्ये… सुजय विखेंचा टोला

Sujay Vikhe Vs Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारबाबत एक मोठे विधान केले होते. 15 दिवसांत हे सरकार गडगडणार आहे, असे विधान राऊतांनी केले. त्यावरून भाजपकडून राऊतांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर काही जण सकाळी नशाबाजी करून बोलतात, असे सुनावले होते. […]

दहा वर्षांच्‍या काळात कृषी क्षेत्राला आत्‍मनिर्भर बनवंण्‍याचं काम झालं -सुजय विखे

दहा वर्षांच्‍या काळात कृषी क्षेत्राला आत्‍मनिर्भर बनवंण्‍याचं काम झालं -सुजय विखे

Sujay Vikhe Vs Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारबाबत एक मोठे विधान केले होते. 15 दिवसांत हे सरकार गडगडणार आहे, असे विधान राऊतांनी केले. त्यावरून भाजपकडून राऊतांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर काही जण सकाळी नशाबाजी करून बोलतात, असे सुनावले होते. राऊतांना आता भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

बारसू रिफायनरीमध्ये कोणाचे हितसंबंध? बाळासाहेब थोरात यांचा थेट प्रश्न

खासदार सुजय विखे म्हणाले, संजय राऊत यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. लवकरच त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागेल. संजय राऊत यांच्यापासून सर्वांनी जपून राहण्याची गरज आहे, असा टोलाही विखे यांनी लगावला आहे.

फडणवीस भावी मुख्यमंत्री ! बॅनर झळकल्यानंतर फडणवीस म्हणाले, अतिउत्साही लोकांनी..

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप 80 टक्के जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास विखेंनी व्यक्त केला. ठाकरे गट आणि मविआमध्ये ही अभद्र युती झाली आहे. ती मशाल घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाकारली आहे, असे विखेंनी म्हटले आहे.

बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाला होणारा विरोध आणि माध्यम प्रतिनिधीवर झालेल्या दडपशाहीबाबत बोलण्यास विखेंनी नकार दिला. मी सध्या जिल्ह्यात जी दडपशाही सुरू आहे. त्याकडे लक्ष देत असल्याचे विखेंनी म्हटले आहे. मात्र माध्यम प्रतिनिधीना झालेल्या दडपशाहीबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालण्याची विनंती करू, असे विखे म्हणाले.

Exit mobile version