बारसू रिफायनरीमध्ये कोणाचे हितसंबंध? बाळासाहेब थोरात यांचा थेट प्रश्न

  • Written By: Published:
बारसू रिफायनरीमध्ये कोणाचे हितसंबंध? बाळासाहेब थोरात यांचा थेट प्रश्न

बारसू रिफायनरी कोणाचे हितसंबंध अडकले आहेत काय? विकासाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे. स्थानिक जनता जर रिफायनरीला विरोध करत असेल तर त्यांच्याशी सरकार चर्चा का करत नाही? असे सवाल थोरात यांनी विचारला आहे. कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात गेल्या दोन दिवसांपासून स्थानिकांचा विरोध वाढत चालला आहे.

या प्रकल्पासाठी सरकारकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे. प्रशासनाकडून हे सर्वेक्षण सुरू होताच नागरिकांनी याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत तीन जाणांना अटक देखील केली आहे. मात्र या अटकेविरोधात आता विविध संघटना मैदानात उतरल्या आहेत.

भावी मुख्यमंत्री ! सासरवाडीत झळकले अजित पवारांचे बॅनर

बारसू रिफानरी संदर्भात बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेसच्या नावाखाली मागच्या आठवड्यात गरीब आदिवासी लोकांच्या जमिनी बळजबरीने ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी महिलांवर लाठी हल्ला केला. काल अंधारात मुंबईतील आरे मधील शेकडो झाडे पोलीस बंदोबस्तात तोडली गेली. या घटना ताज्या असताना कालपासून कोकणाचा निसर्ग उध्वस्त करणाऱ्या बारसु रिफायनरीचा विरोध करणाऱ्या स्थानिक राहिवाशांवर पोलिसांनी दमदाटी सुरू केली आहे.

दुसरीकडे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात घडत असताना मुख्यमंत्री महोदय सुट्टीवर गेले आहेत आणि उपमुख्यमंत्री चकार शब्द काढायला तयार नाहीत. बारसू रिफायनरी कोणाचे हितसंबंध अडकले आहेत काय? विकासाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे. स्थानिक जनता जर रिफायनरीला विरोध करत असेल तर त्यांच्याशी सरकार चर्चा का करत नाही? असे सवाल थोरात यांनी विचारले आहेत.

मुख्यमंत्री सुट्टीवर! प्रश्न विचारातचं अजितदादा भडकले, म्हणाले “नॉट रिचेबल माझ्यापुरतं…”

रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी स्थळी स्थानिक नागरिक महिला मुले सर्वजण रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करत आहेत. आज पोलिसांनी त्यांच्यावर व वार्तांकन करणा-या माध्यम प्रतिनिधींवर दडपशाही सुरु केली आहे हे अत्यंत निषेधार्ह असून सरकारने ही दडपशाही आणि सर्वेक्षण तात्काळ थांबवावे, अशी मागणी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube