BJP News : ठाकरे गटाने आज सामनातून भाजप आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही फडणवीसांच्या पत्रावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आता भाजपही (BJP News) आक्रमक झाला असून भाजपने ठाकरे गटाला सोशल मीडियावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हाला आता नैतिकतेच्या गप्पा मारण्याचा अधिकार राहिला तरी कुठे?, असा सवाल भाजपने विचारला आहे.
भाजपाने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे, उबाठाचे नेते आणि त्यांचे संपादक पोपटलाल यांनी त्यांच्या अडीच वर्षांतील महाविकास आघाडीचं ऑडिट केलं असतं तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे उबाठा एनपीएत गेली. तुम्हाला आता नैतिकतेच्या गप्पा मारण्याचा अधिकार उरला कुठे?
Uddhav Thackeray : ‘हिंदु्त्व’ हा भाजपासाठी राजकीय खेळ पण.. ; संसदेतील घटनेवरून ठाकरे गट आक्रमक
नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल झाला, ते जेलमध्ये गेले. सध्या वैद्यकिय कारणांमुळे त्यांना जामीन मिळाला. पण प्रफुल्ल पटेल यांचं प्रकरण वेगळं आहे. त्यांच्यावर ना गुन्हा दाखल आहे ना ते जामीनावर बाहेर आहेत. उद्या प्रफुल्ल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता, तर जी भूमिका नवाब मलिक यांच्याबाबत, तीच पटेल यांच्याबाबतही असती. उबाठा गटानं नैतिकतेचं ढोंग आजिबात रचू नये. नवाब मलिक तुरुंगात असून सुद्धा शेवटपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत तुम्ही दाखवली नव्हती. हे राज्यातील जनतेनं पाहिलंय. त्यामुळे ऑडिट करायचंच असेल तर तुमच्या अडीच वर्षांच्या काळातील नैतिकतेचं करा. तो रिपोर्ट पाहून तुम्हाला तों दाखवायलाही जागा राहणार नाही, अशी जळजळीत टीका भाजपनं या पोस्टद्वारे केली आहे.
सामनात काय लिहिलं होतं ?
फडणवीस यांनी मोदी शहांना एक पत्र लिहून प्रफुल पटेलांना भेटणे देखील हिताचे नाही. नैतिकतेत ते बसत नाही, असे सांगण्याचे धाडस दाखवावे. तरच मलिकांच्या बाबतीत त्यांच्या नैतिकतेच्या उचक्या खऱ्या. नाहीतर पैशांचं सोंग आणि भाजपाच्या नैतिकतेचं ढोंग सारखंच, अशी जहरी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली होती. ठाकरे गटाची ही टीका भाजपला चांगलीच झोंबली. त्यांनीही मग ट्विट करत ठाकरे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिले.
Sanjay Raut : तीन घाशीराम सरकार चालवतात, भाजपाकडे नैतिकताच नाही; राऊतांचा हल्लाबोल