Download App

राज्यात पुन्हा आमदारांची फोडाफोडी? शिंदे-ठाकरेंसह सर्वांचे आमदार 5 स्टार हॉटेलात रवाना

Vidhan Parishd Election साठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे आमदार फोडाफोडीच राजकारण होण्याची धास्ती सर्वच पक्षांनी घेतली आहे.

BJP, Shivsena, NCp UBT MLA in Hotel for Vidhan Parishd Election : राज्यामध्ये सध्या विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishd Election) रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये मतांचे गणित साध्य करण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे आमदार (MLA ) फोडाफोडीच राजकारण पुन्हा होऊ शकतं याची धास्ती सर्वच पक्षांनी घेतली आहे.

दूध उत्पादकांसाठीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करा; मंत्री विखे पाटलांच्या सूचना

त्यामुळे भाजपसह (BJP) शिवसेना शिंदे, (Shivsena) अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने आपल्या आमदारांना थेट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रवाना केला आहे. त्यामध्ये भाजपचे आमदार ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये, शिवसेना शिंदे गटाचे आमदार ताज लँड्स एंडमध्ये, अजित पवार यांचे आमदार ललित हॉटेलमध्ये, तर ठाकरे गटाचे आमदार हे परळमधील आयटीसी ग्रँड सेंट्रल या हॉटेलमध्ये सध्या मुक्कामी आहेत.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आजपासून कोस्टल रोडचा महत्त्वाचा टप्पा एका अटीसह खुला

दरम्यान 2022 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीवेळी देखील अशाच प्रकारे आमदारांच्या फोडाफोडींचे राजकारण त्याचबरोबर क्रॉस वोटिंग झालं होतं. ज्यामधून भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये बाजी मारली होती. तसेच हीच विधान परिषदेची निवडणूकनंतर शिवसेना पक्षामध्ये फूट पडण्याचा पाया ठरला. कारण त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत 40 आमदार घेऊन सुरत गुवाहाटी मार्गे गोवा गाठत थेट सरकार स्थापन केलं.

त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच नाही तर महायुतीमध्ये देखील आमदारांमध्ये नाराजीच्या वारंवार चर्चा समोर येत आहेत. त्यामुळे क्रॉस वोटिंग तसेच आमदारांची फोडाफोडी हे सर्व गोष्टी टाळण्यासाठी या सर्व पक्षांकडून कोट्यवधींचा खर्च करून या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येत आहे.

follow us