मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आजपासून कोस्टल रोडचा महत्त्वाचा टप्पा एका अटीसह खुला
Mumbai Costal Road Open today in Time Limit : मुंबईकरांसाठी (Mumbai) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आजपासून मुंबई महानगरपालिकेचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प मानला गेलेला सागरी किनारा मार्ग म्हणजेच कोस्टल रोड (Costal Road) प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. सध्या रोडचा एक महत्त्वाचा टप्पा असलेला हाजी अली ते वरळी हा सुरू करण्यात आला आहे. तर वांद्रे वरळी सी-लिंक ते कोस्टल रोडचा महत्त्वाचा टप्पा देखील लवकरच सुरू होणार असल्याचं महानगरपालिकेकडून सांगण्यात आला आहे.
Horoscope Today: आजचे राशी भविष्य 11 जूलै 2024, या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस परीक्षा घेणारा
🛣️ धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाची सुविधा देणारा टप्पा आणि हाजी अली आंतरबदलातील आर्म ८ (लोटस जेट्टी जंक्शनपासून ते उत्तर वाहिनी मार्गिकेवरील हाजी अली येथील मुख्य पूल) उद्या… pic.twitter.com/oUlmQxGAfy
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 10, 2024
सध्या सुरू करण्यात आलेला हाजी अली ते खान अब्दुल गफार खानमार्ग पर्यंतचा साडेतीन किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी विशिष्ट वेळेमध्ये मुंबईकरांसाठी खुला असणार आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री अकरा या वेळेतच या मार्गावरील वाहतूक सुरू राहील. त्याचबरोबर या प्रकल्पातील उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हा मार्ग बंद असणार आहे. अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया हँडल वरून देण्यात आली.
‘सरकारने मला आजपर्यंत रुपयाचाही निधी दिला नाही; आमदार आव्हाडांचे टीकास्त्र
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे साडे तीन किलोमीटर लांबीच्या या टप्प्याची बुधवारी (10 जुलै) प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) यतीन दळवी यावेळी उपस्थित होते.
या पोस्टमध्ये महानगर पालिकेने सांगितले की, धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाची सुविधा देणारा टप्पा आणि हाजी अली आंतरबदलातील आर्म 8 (लोटस जेट्टी जंक्शनपासून ते उत्तर वाहिनी मार्गिकेवरील हाजी अली येथील मुख्य पूल) उद्या गुरुवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून तात्पुरत्या स्वरुपात खुला होणार आहे.