BJP On Sharad Pawar : यंदाच्या आषाढी वारीत (Ashadhi Wari) शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) वारीत सहभागी होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, हे दोघेही वारीत दिसून न आल्यामुळे भाजपने (BJP) या दोन्ही नेत्यांवर सडकून टीका केली आहे. शेवटी ते वारीला आलेच नाहीत. वारीतल्या भगव्या पताक्याचा त्यांनी इतका द्वेष का, असा सवाल भाजपने केला.
उद्याच आयुक्त कार्यालयात हजर व्हा, पुणे पोलिसांनी धाडली पूजा खेडकरांना नोटीस…
शेवटी ते वारीला आलेच नाहीत…
वारीतल्या भगव्या पताक्याचा राहुल गांधी आणि शरद पवारांना इतका द्वेष का? @PawarSpeaks आणि @RahulGandhi यांचे जे काही थोडे खासदार अपप्रचारमुळे निवडून आले… आणि विशेष व्होट बँक नाराज होईल या भितीने दोघांनी वारीत येण्याचे टाळले. यापूर्वी विठुरायची…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 17, 2024
भाजपने ट्विटवर एक पोस्ट लिहिली. राहुल गांधी वारीला येणार शेवटी ते वारीला आलेच नाहीत…वारीतल्या भगव्या पताक्याचा राहुल गांधी आणि शरद पवारांना इतका द्वेष का?, असा सवाल भापजने या पोस्टमध्ये केला. पुढं लिहिलं की, शरद पवार आणि राहुल गांधी यांचे जे काही थोडे खासदार अपप्रचारामुळे निवडून आले आणि विशेष व्होट बॅंक नाराज होईल या भीतीने दोघांनी वारीत येण्याचं टाळलं. यापूर्वी विठुरायाची मूर्ती नाकारलेल्या राहुल गांधींने वारीचे आमंत्रण स्वीकारून देखीलही वारीत सहभागी झाला नाही, त्यामुळे त्यांने पुन्हा एकदा वारकऱ्यांचा, परंपरेचा अपमान केला आहे, अशी एकेरी टीका राहुल गांधींवर केली.
IAS पूजा खेडकरच्या घराबाहेर अतिक्रमण; पुणे मनपाने बुलडोझर चालवला
हिंदू धर्म ज्यांचा चेष्टेचा विषय असतो, अशा शरद पवारांना यंदा वारी आठवली. मात्र, आपल्या सवयीप्रमाणे त्यांनी शेवटी काढता पाय घेतला. शेवटी आमचे तुकोबाराय म्हणालेच आहेत की येऱ्यागबाळ्याचे काम नोहे, असा टोला भाजपने पवारांना लगावला.
रामकृष्ण हरीचा जयघोष रुचलाच नसता
वारीतली भगवी पताका खांद्यावर घेण्यासाठी पाठीशी पुण्याई आणि विठूरायाबद्दलची आस्था हवी. तुम्ही मााध्यमांना हाताशी धरून वारीत सहभागी होण्याच्या वावड्या उठवल्या खऱ्या. मात्र, तुमची पुण्याई कमी पडली. गेली अनेक शेतके वारीची ही परंपरा चालत आलेली आहे. लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक तितक्याच उत्साहाने येतात. हिंदूद्वेषी आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना वारीतील रामकृष्ण हरीचा जयघोष रुचलाच नसता, असा टोला भाजपने पवार आणि राहुल गांधींना लगावला.