Download App

भाजपने शड्डू ठोकला! विरोधकांना आस्मान दाखवण्यासाठी नेमणार एक लाख वॉरियर्सची टीम

  • Written By: Last Updated:

Chandrasekhar Bawankule : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. २०२४ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली. भापजकडूनही विधानसभा आणि लोकसभा जिंकण्यासाठी अनेक अभियान राबवण्यात येते आहे. दरम्यान, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी राज्यात भाजप एक लाख सोशल मीडिया वॉरियर्स नेमणार असल्याची घोषणा केली.

आज माध्यमांना बोलतांना बावनकुळे यांनी सोशल मीडियावर विरोधकांचे वस्त्रहरण करा, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. बावनकुळेंनी सोशल मीडिया कार्यकर्त्यांना एक प्रकारे हे आदेशच दिले आहेत. राज्यात भाजप एक लाख सोशल मीडिया वॉरियर्स नेमण्याचं आमचं लक्ष्य आहे. सोशल वॉरियर्सच्या माध्यमातून विचार आणि सिध्दातांवर चर्चा करण्यात येणार आहे. जो प्रचार विरोधकांकडून केला जातो, त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर या वॉरियर्सच्या माध्यमातून दिलं जाईल. त्याचबरोबर आगामी निवडणुकांत विरोधकांना पराभूत करायचं असेल तर प्रत्येक महिन्यात कार्यकर्त्यांनी देखील किमान ९० तास सोशल मिडियावर खर्च करावेत,असं आवाहन बावनुकळंनी केलं.

“अजितदादांशी बोलून घ्या, तिकडून ग्रीन सिग्नल आला की लगेच…”; जय पवारही राजकीय एन्ट्रीसाठी सज्ज 

काल कॉंग्रेसच्या राज्यस्तरीय शिबिरात बोलतांना कॉंग्रेचे प्रवक्ते अलोक शर्मा यांनी आगामी निवडणुकांमध्ये भाजपच्या हायटेक प्रचाराला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यासाठी कॉंग्रेसचे सोशल मीडिया वॉरीयर्स सज्ज असल्याचं सांगितलं होतं. भापजशी दोन हात करण्यासाठी कॉंग्रेसही सज्ज असून कॉंग्रेसचे सोशल मीडिया वॉरियर्सची आगामी काळात कॉंग्रेसच्या यशात मोठा वाटा असेल,असं सांगितलं. त्यानंतर आता भाजपनेही तसाच निर्णय घेतला आहे. त्यामुळं भाजप आणि कॉंग्रेसमध्ये आगामी काळात सोशल वॉर पाहायला मिळणार आहे.

Tags

follow us