Download App

भाजपाकडून आगामी निवडणुकांसाठी ‘चिंचवड पॅटर्न’…

मुंबई : प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी)

कसबा निवडणुकमध्ये झालेल्या पराभवाची भाजपने गंभीर दखल घेतली आहे. कसबा निवडणुकीत पराभव तर चिंचवडमध्ये झालेला विजय याचा अभ्यास केला जात आहे. या दोन्ही निवडणुकीतून एक बाब समोर आली आहे जर महाविकास आघाडी एकत्र राहिली. एकास एक निवडणूक झाली तर भाजपाचा पराभव होतो हे कसबा निवडणुकीने दाखवून दिले. तर महाविकास आघाडीत बंडखोरी झाली तर मतांची विभागणी होऊन यामध्ये भाजपचा उमेदवार जिंकतो हे चिंचवड निवडणुकीने दाखवले आहे.

ही बाब लक्षात घेत आता भाजपने पुढील रणनिती तयार केली आहे. आगामी काळात भाजप हा राज्यभर ‘चिंचवड पॅटर्न’ लागू करणार असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना सांगून टाकले आहे. आम्ही कसबा हरलो, भाजप पोटनिवडणूक हरते पण नंतर राज्यातील निवडणुका जिंकते. आता आम्ही जिंकण्याची तयारी सुरु केली आहे. आम्ही आता कसबा सारखी चूक करणार नाहीत, असेही शिंदे म्हणाले आहे.

आमच्या लक्षात आले आहे. भाजप एकास एक लढत मध्ये हरणार. मुख्य निवडणुकीमध्ये कसबा – चिंचवड पोटनिवडणूक सारखं होणार नाही. महाविकास आघाडीतील बंडखोर गप्प बसणार नाही. ते पण उभेच रहातील ना? अस मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे.

तुम्ही मॉलमध्ये जाऊन माणसांना माराल तर कसं चालेल? मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांना सुनावले

तेव्हा चिंचवड पॅटर्न हा आगामी काळात राबवला जाणार असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल. या लढाईत महाविकास आघाडीचा बंडखोर उमेदवार उभा केला तर महाविकास आघाडीच्या मताची विभागणी होईल आणि भाजप उमेदवार निवडून येईल. हा पॅटर्न चिंचवडमध्ये हिट ठरला आहे. आता हा पॅटर्न राज्यात राबवण्याची तयारी भाजपने केली असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

Tags

follow us