तुम्ही मॉलमध्ये जाऊन माणसांना माराल तर कसं चालेल? मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांना सुनावले
मुंबई : एका सिनेमाच्या वादावरून माजीमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मॉलमध्ये जाऊन एकाला मारहाण केली होती. याच मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आव्हाड यांना चांगलाच शाब्दिक टोला लगावला आहे. तुम्ही मॉलमध्ये जाऊन माणसांना मारलं तर कसं चालेल. तुमच्या या मारहाण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे, असे यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर चांगलाच खडेबोल सुनावले आहे. यावेळी शिंदे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावरून विरोधकांना धारेवर धरले तसेच त्यांनी विरोधक मंत्र्यांवर देखील शाब्दिक निशाणा साधला आहे. शिंदे म्हणाले, आम्ही कोणावरही खोटी कारवाई करणार नाही. मात्र राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले माझ्यावर खोटे गुन्हे दाखल आहेत. मात्र अरे बाबा तू मॉल मध्ये जाऊन मारामारी करणार मग गुन्हा दाखल होणारच. याप्रकरणी खुद्द सुप्रीम कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
कायदा- सुव्यवस्थेवरून विरोधकांना सुनावले…
कायदा सुव्यवस्थेवरून राज्यात काय परिस्थिती होती यावरून शिंदे यांनी तत्कालीन सरकारला सुनावले आहे. तसेच दोषी असलेल्या कोणालाही सरकार पाठीशी घालणार नाही आहे. साधू हत्याकांड झालं, लष्कराच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण झाली, जळित कांड झालं, संभाजीनगरच्या दुर्दैवी घटना घडली, मुंबईतल्या साकीनाका भागात दुर्दैवी घटना घडली, शर्जील उस्मान, मनसुख हिरेन असे कितीतरी प्रकरणं राज्यात उद्धव ठाकरेंच्या काळात घडली.
अंकुरलेले हरभरे खा आणि तंदुरुस्त व्हा…जाणून घ्या फायदे
मात्र आता गुन्ह्यांची नोंद केली जाते, तपास केला जातोय. म्हणूनच गुन्हेगारांना आळा घालण्याचं काम सरकार करतं आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तत्कालीन सरकारमध्ये खोटे गुन्हे करण्याचे प्रमाण वाढेल होते. हनुमान चालीसा वरून रवी राणा आणि त्यांच्या पत्नीला तुरुंगात टाकले. कंगनाचं घर सोडलं. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं. आता आम्ही असं काहीही वागत नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.