अंकुरलेले हरभरे खा आणि तंदुरुस्त व्हा…जाणून घ्या फायदे
मुंबई : अंकुरलेले धान्य आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते हे तर आपल्या सर्वांना माहितीच असेल. अंकुरित मूग, अंकुरलेली मटकी, अंकुरलेले शेंगदाणे आणि अंकुरलेले गहू या सर्वाचा शरीराला मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो. त्याचप्रमाणे अंकुरलेला हरभरा देखील पौष्टिकतेच्या बाबतीत कमी नाही. अंकुरलेले हरभरे म्हणजे प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे यांच्या मुख्य स्रोत आहे.
अंकुरलेल्या हरभऱ्यात फायबर, मॅंगनीज, तांबे, प्रोटीन, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जीवनसत्त्वे ए, बी6 आणि सी आणि पोटॅशियम.असे पोषक तत्व देखील भरपूर प्रमाणात आढळतात. चला तर मग आज आपण जाणून घेऊया नियमित अंकुरलेले हरभरे खाण्याचे आरोग्याला कोणते फायदे होतात .
निरोगी हृदय : अंकुरलेले हरभरे याचे नियमित सेवनाने रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत होते आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
रक्तातील साखर नियंत्रित करते : अंकुरलेल्या हरभऱ्यातील कॉम्प्लेक्स कर्बोदके हळूहळू पचतात. याशिवाय त्यात विरघळणारे तंतू असतात, जे रक्तातील साखरेचे शोषण कमी करतात. यातील पोषक घटकामुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते.
मेंदूची कार्यक्षमता वाढते : अंकुरलेल्या हरभऱ्यामध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. हरभऱ्याचे हे घटक मेंदूच्या कार्याला चालना देतात, विचार करण्याची क्षमता सुधारतात, स्मरणशक्ती मजबूत करतात आणि एकाग्रता सुधारतात.
बद्धकोष्ठता आणि मूळव्याध : कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया निरोगी राहते. यामुळेच याचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि मूळव्याध या आजारापासून बचाव होऊ शकतो.
Deepali Sayyed : तुमची बग-बग थांबवा आता, संजय राऊतांना डिवचलं
स्नायू मजबूत करते : अंकुरलेल्या हरभऱ्यामध्ये प्रथिने जास्त आढळतात. वजन कमी करण्यासाठी आणि कमकुवत लोकांसाठी त्यांच्या स्नायूंना पुनरुज्जीवित करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. अंकुरलेल्या हरभऱ्याच्या एका सर्व्हिंगमध्ये सुमारे 10 ग्रॅम प्रथिने आढळू शकतात.