विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने ( BJP) पाच जणांची उमेदवारी जाहीर केलीय. कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe), माधवी नाईक, संजय भेंडे, प्रमोद जठार, सुनील कर्जतकर या पाच जणांना उमेदवारी जाहीर केलीय. तर पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने विधानपरिषदेला संधी देताना ही पक्ष संघटनांना वाढविण्यासाठी झगडणाऱ्या चार जणांना उमेदवारी दिली आहे.
आहे. त्यात केवळ विवेक कोल्हे हे साखर कारखान्याशी संबंधित आहेत.
भाजपचा धक्का, बड्या नेत्यांना डावलले
माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, अकलूजचे माजी आमदार राम सातपुते, पुण्यातून जगदीश मुळीक हेही इच्छुक होते. परंतु भाजपने बड्या नेत्यांना धक्का दिले आहे. तसेच पक्ष संघटना वाढविण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्यांना कार्यकर्त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे.
(BJP’s list for Legislative Council released; Fivesome included Vivek Kolhe, Madhavi Naik)
कोण आहेत उमेदवार ?
प्रा. संजय भेंडे
प्रा. संजय भेंडे हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते नागपूरमधील महत्त्वाचे नेते आहेत. डिसेंबर 2025 च्या माहितीनुसार त्यांची भाजप उत्तर नागपूर विधानसभा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रमोद जठार
प्रमोद जठार हे भाजपचे महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे नेते आणि माजी आमदार आहेत. कोकण पट्ट्यात भाजपचे संघटन मजबूत करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्षाने अनेक स्थानिक निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्यावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ‘निवडणूक प्रमुख’ म्हणून जबाबदारी सोपवली होती. खासदार नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांच्यासोबत समन्वय राखून जिल्ह्यात पक्ष वाढवण्यात जठार यांचा मोठा वाटा आहे.
विवेक कोल्हे
विवेक कोल्हे हे कोपरगाव (अहिल्यानगर) भागातील युवा नेते आहेत. ते सहकारी कारखान्याशी संबंधित आहे. विधानसभेची निवडणूक ते लढले नव्हते. तेव्हा त्यांना गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिला होता. त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देऊन भाजपच्या नेत्यांनी शब्द पाळला आहे.
माधवी नाईक
भाजपच्या संघटनात्मक कामात सक्रिय महिला नेत्या आहेत. या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महाराष्ट्र प्रदेशातील एक वरिष्ठ आणि आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. विशेषतः महिला सक्षमीकरण आणि संघटनात्मक कार्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सध्या त्या भाजप महाराष्ट्र प्रदेशाच्या ‘महामंत्री’ म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहे. त्या ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक होत्या. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
सुनील कर्जतकर
हे भाजपचे प्रदीर्घ काळ काम करणारे संघटक नेते आहेत, ज्यांना गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांतील संघटनात्मक कामाचा अनुभव आहे.
