CM K. Chandrashekhar Rao Pandharpur Visit : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे मंत्रिमंडळ, आमदार, बीआरएसचे पदाधिकारी यांना घेऊन पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात बीआरएसचा विस्तार करण्यासाठी राव यांनी मोठा जोर लावला आहे. त्यासाठी आषाढी एकादशीची मुहूर्तच बीआरएसने साधला आहे. पण आता बीआरएसला जिल्हा प्रशासनाने एक झटका दिला आहे. )blow to BRS cm k chandrashekhar rao pandharpur visit )
वाखरी येथे सर्व संताचे पालखी सोहळे आल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री व बीआरएस पक्षाचे प्रमुख के.चंद्रशेखर राव यांनी हेलिकॉफ्टरमधून पुष्पवृष्टी करणार आहेत. मात्र पुष्पवृष्टी करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. यामुळे बीआरएस पक्षावतीने आंदोलन करण्याचा इशारा विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगिरथ भालके यांनी दिला आहे.
एमआयडीसीसाठी केवळ स्टंटबाजी; सुजय विखेंचा रोहित पवारांवर निशाणा
मंगळवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव मंत्रिमंडळ घेऊन विठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. उद्या ते विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. संताचे पालखी सोहळे वाखरी येथे एकत्र येतात. यावेळी पालखी सोहळ्यावर हेलिकॉफ्टरमूधन पुष्पवृष्टी करण्याबाबत पालखी सोहळा प्रमुखांकडून परवानगी घेण्यात आली आहे. मात्र जिल्हाधिकारी यांनी पुष्पवृष्टी करण्यास परवानगी नाकारली आहे. त्याएेवजी
अकलूज येथे पालखी सोहळयावर हेलिकॉफ्टरमधून पुष्पवृष्टी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
FIR against Vijay: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय विरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
बीआरएसमध्ये प्रवेश करण्यासाठी शक्तिप्रदर्शन करत असलेले भगिरथ भालके याला तयार नाहीत.
जिल्हा प्रशासन बीआरएस पक्षाची अडवणूक करती आहे. यामुळे आंदोलन करण्याचा इशारा भगिरथ भालके यांनी दिला आहे.
आणखी एक झटका के. चंद्रशेखर राव यांनाच व्हीआयपी दर्शन
पुष्पवृष्टीबरोबर विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या तेलंगणाच्या मुख्यमंत्री केसीआर यांना आणखी एक धक्का बसला आहे. मंगळवारी केवळ चंद्रशेखर राव यांनाच व्हीआयपी दर्शन मिळणार आहे. त्यांच्यासोबत आलेले मंत्रिमंडळ, आमदार, खासदारांना सोडण्यात येणार नसल्याचं मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आषाढी वारी सुरू असल्याने व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी स्पष्ट केले आहे.