एमआयडीसीसाठी केवळ स्टंटबाजी; सुजय विखेंचा रोहित पवारांवर निशाणा

Sujay Vikhe On Rohit Pawar : कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) मतदारसंघात एमआयडीसी होण्यासाठी आमदार रोहित पवार हे प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात एमआयडीसीची (MIDC) अधिसूचनाही निघाली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यासाठी रोहित पवार हे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटत आहे. मला श्रेय मिळू नये, म्हणून आमदार राम शिंदे हे एमआयडीसीचा निर्णय घेऊ देत नाही, असा आरोपही रोहित पवारांनी करत एमआयडीसीसाठी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून खासदार सुजय विखेंना रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.(Karjat-midc-sujay-vikhe-speak-on-rohit-pawar)
आधी घरातल्या वाटण्या करा, प्रदेशाध्यक्ष पदावरून सुजय विखेंचा अजित पवारांना चिमटा
खासदार सुजय विखे म्हणाले, उपोषणाचे उगम एका आमदाराने नगर जिल्ह्यात केला आहे. ही दुर्देवी बाब आहे. काही झाले तरी माध्यमांसमोर मत मांडत आहे. एमआयडीसीसाठी पाणी लागते. आधी शेतकऱ्यांना हक्काचे पाणी द्या. पाण्यासाठी उपोषण करा मग एमआयडीसीसाठी उपोषण करा, असा टोलाही विखेंनी रोहित पवारांना लगावला आहे. एमआयडीसीसाठी रोहित पवारांची केवळ स्टंटबाजी सुरू असल्याचा आरोपही विखे यांनी केला आहे.
तर कुकडीच्या आवर्तनावरून खासदार विखे यांनी आमदार रोहित पवार, निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार बबनराव पाचपुते, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यामुळे आवर्तन मिळाले आहे. राष्ट्रवादीच्या पुण्यातील नेत्यांनी आवर्तन वाढवून देण्यास विरोध केला. आवर्तन वाढवून द्यायचे असेल तर गोळ्या घाला, अशी भाषा राष्ट्रवादीच्या काही जणांची होती. पण त्याविरोधात नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही जण बोललेला नाही. राष्ट्रवादीच्या दोन आमदारांच्या कार्यक्षेत्रात कुकडीचे आवर्तन जाते. तरीही ते गप्प असल्याची टीकाही विखे यांनी केली आहे. केवळ भाजपच कुकडीचे पाणी देईल, इतर कुणीही देणार नाही, असा दावाही सुजय विखे यांनी केला आहे.
पवारांनी केली ती मुत्सद्देगिरी, शिंदेंनी केली ती बेईमानी कशी, फडणवीसांचा सवाल
सुजय विखे यांनी माध्यमांशी बोलताना भावी मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवरून जोरदार टोला लगावला आहे. रिटारमेंट झाल्यावर हे नेते मुख्यमंत्री होतील, असा टोलाही विखेंनी लगावला आहे. तसेच प्रदेशाध्यक्षपदावरून अजित पवारांनाही विखे यांनी डिवचले आहे.