आधी घरातल्या वाटण्या करा, प्रदेशाध्यक्ष पदावरून सुजय विखेंचा अजित पवारांना चिमटा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मेळावे घेण्यापेक्षा, महाराष्ट्र दौरा करण्यापेक्षा एकदा घरात बसून ठरवले पाहिजे. मुख्यमंत्री कोण होणार, नवा अध्यक्ष कोण होणार, प्रेदेशध्यक्ष कोण होणार, खजिनदार कोण होणार आहे, कोण कुठे जाणार आहे, कोण कोणाबरोबर जाणार आहे. अशा घरातल्या वाटण्या करून मग महाराष्ट्राच्या जनतेला अश्वस्त करा असा टोला भाजपचे खासदार सुजय विखेंनी विरोधीपक्ष नेते पद सोडण्यावरून अजित पवारांना लगावला ते आज अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.(Divide the house first, Sujay Vikhe will pinch Ajit Pawar from the post of state president)
काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचे शिवधनुष्य पेलण्याची स्वत:हून तयारी दर्शवली. त्यासाठी मला विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करा.
अजित पवार यांची ही मागणी म्हणजे ते आता अप्रत्यक्षरित्या नाहीतर थेटपणे संघटनेची सुत्रे स्वत:कडे घेण्याचा त्यांच्या प्रयत्न असल्याचे दिसत आहे. आगामी निवडणुकीत पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून अजितदादांना पुढे यायचे नाही ना, अशी चर्चा त्यांच्या भाषणातनंतर रंगली होती.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे यांची निवड झाली. त्यावेळी देखील अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु यावर प्रतिक्रिया देत अजित पवारांनी या चर्चा थांबवल्या. तसेच राष्ट्रवादी पक्षाकडून वारंवार अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री पदाचे बॅनर लागत असतात. त्यावरूनच खासदार सुजय विखेंनी पवार कुटुंबाला आधी घरातल्या वाटण्या करा असा टोला लगावला.