Press Conference : कुणावर बाँब, कुणाचे ‘सत्य’ उघड करणार ? तांबेंची आज पत्रकार परिषद

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवारी करून जित मिळविणारे सत्यजित तांबे हे आज सायंकाळी नाशिक येथील मुंबई नाका परिसरात पत्रकार परिषद घेणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. मात्र विजय मिळताच काँग्रेसकडून त्यांच्या विषयी ‘सॉफ्टकॉर्नर’ देण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या पत्रकार परिषदेत ते कुणावर बॉंब […]

Untitled Design   2023 02 04T122615.729

Untitled Design 2023 02 04T122615.729

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवारी करून जित मिळविणारे सत्यजित तांबे हे आज सायंकाळी नाशिक येथील मुंबई नाका परिसरात पत्रकार परिषद घेणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. मात्र विजय मिळताच काँग्रेसकडून त्यांच्या विषयी ‘सॉफ्टकॉर्नर’ देण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या पत्रकार परिषदेत ते कुणावर बॉंब टाकणार आणि कुणाचे ‘सत्य’ उघड करणार यावर चर्चा सुरू झाली आहे.

सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक राज्यभर गाजली. शिवसेनेच्या शुभांगी पाटील यांना काँग्रेससह महाविकास आघाडीने पाठिंबा दिला. तरी काँग्रेसमधील थोरात समर्थक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सत्यजित तांबेंना उघड पाठिंबा दिला. त्यामुळे यातील काही पदाधिकाऱ्यांना आपले पदही गमवावे लागले होते.

निवडणुकीत शुभांगी पाटलांच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी तांबे पिता-पुत्र अर्धसत्य सांगत असल्याचा आरोप केला होता. यावर सत्यजित तांबेनी मी लवकरच पूर्ण सत्य सांगेल असे सूचक विधान केले होते. हे सत्य काय आणि ते सत्य ते आज उघड करणार का? हे लवकरच कळणार आहे.

तांबे हे भाजपमध्ये प्रवेश करतील. त्याची घोषणा ते करतील असाही कयास लावला जात आहे. तर काँग्रेसकडून तांबे हे काँग्रेसचेच असल्याचे सांगण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तांबे नक्की कुठे जाणार, त्यांची आगामी भूमिका काय असणार हे आज सायंकाळी स्पष्ट होईल, असे बोलले जात आहे.

Exit mobile version