Download App

Video : एकनाथ शिंदे काम करू शकणार का?; तपासणी केलेल्या डॉक्टरांनी दिलं महत्त्वाचं उत्तर!

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात तपासणी झाली. तपासणीनंतर डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधला असून महत्वाची माहिती दिलीयं.

Eknath Shinde : राज्यात एकीकडे मुख्यमंत्रिपद (Maharashtra chief Minister) कोण होणार? याकडं सर्वांचंच लक्ष लागेललं असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती बिघडल्याचं समोर आलंय. साताऱ्यातील गावी असतानाच शिंदेंची तब्येत बिघडल्याने ते आज ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे काम करु शकतात, असं ठामपणे सांगितलंय. त्यामुळे आता पुढील काही दिवसांत एकनाथ शिंदे सक्रिय होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकहाती सत्ता आलीयं. यामध्ये भाजपला सर्वाधिका जागा मिळाल्याने आता मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार असल्याचं स्पष्ट झालंय. अशातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतीतून माघार घेत पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना तुम्ही घ्याल तो निर्णय मान्य असल्याचं सांगितलंय. त्यामुळे आता भाजपचा मार्ग सुकर झालायं. अशातच एकनाथ शिंदे यांनी अचानक आपला दौरा गावी केला. याचदरम्यान, त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली. तर शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना ऊत आला होता.

”तिकीट फायनल झालं, गावाकडं आलो अन् ठाकरेंनी शब्द फिरवला”; रविकांत तुपकरांचा मोठा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्यानंतर भाजपसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केलीयं. त्यानंतर ते आज ज्युपिटर रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाले. शिंदेंची तपासणी केल्यानंतर ज्युपिटरचे डॉ. अजर ठक्कर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, एकनाथ शिंदे आजारी होते, त्यांना इन्फेक्शन झालंय. त्यांंचं आत्ताच एमआरआय केलं असून त्यांचा रिपोर्ट चांगला आहे. ते आत्ताच आपल्या समोरुन गेले असून काम करु शकतात, असं ठक्कर यांनी स्पष्ट केलंय. तर डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांना अगदी थोडक्यात प्रतिक्रिया दिलीयं. ते म्हणाले, माझी तब्येत चांगली होती, ज्युपिटर रुग्णालयात मी तपासणीसाठी आलो होतो. माझी प्रकृती उत्तम असल्याचं एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय.

दरम्यान, येत्या 5 डिसेंबर रोजी मुंबईत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.

follow us