Download App

Anil Deshmukh : अनिल देशमुखांना दणका! मुलगी अन् सुनेविरोधात CBI कडून आरोपपत्र दाखल

Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. सीबीआयने त्यांना जोरदार झटका दिला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने दिलेल्या क्लिनचीट अहवालाची माहिती लीक केली म्हणून अनिल देशमुख यांची मुलगी आणि सुनेविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठीही ही धक्का देणारीच बातमी आहे. 2021 मध्ये सादर केलेल्या अहवालात क्लीनचीट दिली अशी माहिती त्यावेळी दिली गेली. या प्रकरणात सीबीआयने सोमवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात अनिल देशमुख यांची मुलगी आणि सून यांची नावं आहेत. या दोघींवर कट रचण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

NCP Crises : 20 हजार प्रतिज्ञापत्रे बनावट, कारवाई करा; शरद पवार गटाच्या वकिलांची मागणी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आरोप केले होते. त्यांच्या आरोपांनंतर सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. त्याच प्रकरणात क्लीनचीट अहवाल लीक झाला होता. या प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांच वकील आनंद डागा आणि सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक केली होती. यानंतर सीबीआयने पुढील कारवाई करत देशमुख यांची कन्या आणि सुनेविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

मुंबईतील हॉटेल्स आणि बार चालकांकडून खंडणी गोळा करण्यास अनिल देशमुख यांनी सांगितल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश सीबीआयला दिले होते. तपास झाल्यानंतर त्याचा अहवाल सीबीआयने न्यायालयात सादर केला होता. अनिल देशमुख यांच्याकडून कोणताही दखलपात्र गुन्हा घडलेला नाही असं या अहवालात म्हटल्याची माहिती त्यावेळी लीक झाली होती. 29 ऑगस्ट 2021 रोजी हा अहवाल माध्यमांत लीक झाला होता. त्यानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच वकील आनंद डागा आणि सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक केली होती.

परमवीर सिंह यांच्याकडून अदृश्य शक्तीचा वापर, अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

अहवाल मिळवण्यासाठी सीबीआयचे सब इन्स्पेक्टर यांना अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनी लाच दिल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशावर सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी केली जात होती. त्यानंतर सीबीआयने आणखी पुढील कारवाई करत सीबीआयच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Tags

follow us