जे लोक आशिर्वाद मागताहेत, तेच साहेबांविरुध्द कटकारस्थान करायचे; अनिल देशमुखांचे टीकास्त्र

जे लोक आशिर्वाद मागताहेत, तेच साहेबांविरुध्द कटकारस्थान करायचे; अनिल देशमुखांचे टीकास्त्र

बीड :  मागील महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 आमदारांनी बंड करत मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीतील या सगळ्या घडामोडीनंतर आता शरद पवारांनी दौरे करायला सुरूवात केली. बीड शहरात शरद पवार यांच्या सभेआधीच बॅनर लावण्यात आले. या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार यांचे फोटो लावून शरद पवारांना ‘कामाच्या माणसाला आशिर्वाद द्या, असी साद घातली. दरम्यान, याच बॅनरबाजीवरून आमदार अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) अजित पवार गटावर जोरदार टीकास्त्र डागलं.

आज शरद पवार गटाची बीडमध्ये सभा झाली. या सभेला संबोधित करतांना देशमुख म्हणाले, आज बीडमध्ये येतांना कामाच्या माणसाला आशिर्वाद द्या, असे सगळीकडे बॅनर लागलेले दिसले. ज्यांनी बॅनर लावले, जे लोक आशिर्वाद मागत आहेत, तेच लोक साहेबांना घरी बसवण्यासाठी कटकारस्थान करायचे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना शरद पवारांनी केली. ते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि त्यांना घर बसवण्याचं, राजकारणातून निवृत्त करण्याचं काम हे लोक करत आहेत. त्यांना आता घरी बसा, वय झालं असे सल्ले द्यायचे, आता तेच आशिर्वाद मागत आहेत, अशी टीका देशमुख यांनी केली.

Satish Shah: दादा कोंडके यांच्या स्टुडिओतील बैलांची जोडीबद्दल अभिनेत्यांनी सांगितली खास आठवण 

यावेळी बोलतांना देशमुख यांनी भापजवरही निशाणा साधला. गेले वर्षभर भाजपला कळाले आहे की, आपण स्वबळावर सरकार आणू शकत नाही. आपले खासदार निवडणूक आणू शकत नाही. तेव्हा त्यांनी शिवसेना फोडली. पण, भाजपला त्याचा काही फायदा झाला नाही, हे लक्षात आले आणि त्यांनी अजित पवार गटाला फोडले. जनता गेल्या वर्षभरापासून भाजपच्या या फोडाफोडीचं राजकारण पाहत आहेत. राष्ट्रवादीचे नेते जरी सत्तेत गेले तरी पदाधिकारी युवक आणि कार्यकर्ते हे शरद पवारांसोबत आहेत. शरद पवारांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, 2024 मध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल, असं देशमुख म्हणाले.

सरकार शेतकरी विरोधी
राज्यात महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. अनेक प्रकल्प हे राज्याबाहेर गेले. अनेक प्रकल्प गुजरातला गेले.यंदा कापसाला भाव नाही. कापूस उत्पादकांचा खर्चही निघाला नाही. सरकारने कापूस आयात केला, परिणामी भाव पडले. त्यामुळं हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका देशमुख यांनी केली.

कोई माई का लाल मुझे रोक नही सकता
सरकार महिला सक्षमीकरणाच्या जाहिराती करतं. मात्र, जानेवारी ते मे महिन्यात 19 हजार 553 महिला बेपत्ता झाल्या. मोदी सरकार संविधानिक संस्थांचा दुरुपयोग होतो. विरोधकांचा आवाज दाबल्या जतोय. मला खोट्या प्रकरणात फसवण्यात आलं. ज्या परमवीर सिंग यांनी माझ्यावर आरोप केले. त्यांनीच नंतर सांगितलं की, अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांचे कुठलेही पुरावे माझ्याकडे नाही. मी ऐकीव माहितीवर आरोप केले. त्यानंतर मला मुक्त करण्यात आलं. आता कोई माई का लाल अनिल देशमुख को रोक नही सकता, असं आव्हानही त्यांनी दिलं.

 

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube