NCP Crises : 20 हजार प्रतिज्ञापत्रे बनावट, कारवाई करा; शरद पवार गटाच्या वकिलांची मागणी

  • Written By: Published:
NCP Crises : 20 हजार प्रतिज्ञापत्रे बनावट, कारवाई करा; शरद पवार गटाच्या वकिलांची मागणी

NCP Crises : अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी करत त्यांनी पक्ष आणि घड्याळ चिन्हांवरच दावा ठोकला. त्यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेला. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गटात सध्या निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीत शरद पवार गटाने मोठे दावे करत अजित पवार गटावर गंभीर आरोप केले. अजित पवार गटाने आयोगासमोर दाखल केलेले प्रतिज्ञापत्र बनावट असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

न्यायाधीशांना अंतरवाली सराटीत पाठविण्याची आयडिया कोणाची : बच्चू कडूंनी सांगितलं गुपीत 

अजित पवार गटाने पक्षावर दावा करत निवडणूक आयोगात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आज सुनावणी झाली. रद पवार गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. सुनावणीनंतर सिंघवी यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलतांना सिंघवी म्हणाले की, आजच्या दीड चाललेल्या सुनावणीत आम्ही आयोगासमोर अनेक धक्कादायक तथ्ये मांडली. याचिकाकर्त्यांनी आयोगासमोर दाखल केलेल्या सुमारे 20 हजार प्रतिज्ञापत्रांची आम्ही तपासणी केली. 8900 प्रतिज्ञापत्रे बनावट असल्याचे आम्ही सांगितले. मृत व्यक्तीचे प्रतिज्ञापत्रही याचिकाकर्त्यांनी दाखले केले होते. काही अप्लवयीन लोकांचे प्रतिज्ञापत्र दिलेत. काही अशी पदे आहेत, जी राष्ट्रवादीत पक्षाच्या घटनेत नाही. तर काही कागदपत्रांवर केवळ गृहिणी आणि झोमॅटो सेल्समन म्हणून स्वाक्षरी केलेल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

अजित पवार गटाकडे कुठलेही समर्थन नाही – सिंघवी
सिंघवी म्हणाले, त्याचसोबत आम्ही 24 श्रेणी कॅटेगिरी तयार केल्या असून त्यातून अजित पवार गटाने दाखल केलेली प्रतिज्ञापत्रे बनावट आहेत. खोटेपणाचे समर्थन करण्यासाठीच हा प्रयत्न करण्यात आला. याचाच अर्थ अजित पवार गटाकडे कुठलेही समर्थन नाही. हे प्रकरण इतके गंभीर आहे की, अजित पवार गटाविरोधात कायदेशीर कारवाई करावी, खोटी कागदपत्रे, खोटे जबाब नोंदवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावाा, अशी मागणी निवडणूक आयोगाला करण्यात आली होती.

‘व्हिडिओची सत्यता पडताळून कारवाई’; ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर फडणवीसांचं स्पष्टीकरण 

अजित पवार गटाची प्रतिक्रिया –
निवडणूक आयोगासमोर आजपासून नियमित सुनावणी चालू होणं अपेक्षिक होतं. पण, काही किरकोळ शपथपत्रांमधल्या तात्रिका बाबी समोर करून शरद पवार गटाकडून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी २० तारखेला होणार असून या प्रकरणात सत्याचा विजय होईल, असा विश्वास शरद पवार गटाने व्यक्त केला आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube