अहमदनगर : सुषमा अंधारेंसारख्या राजकारणातील सक्रिय महिलेला जर आपली तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशमध्ये तासन् तास वाट पाहावी लागली. पोलीस तक्रार घेत नाहीत म्हणून महिला आयोगाकडे धाव घ्यावी लागली हे दुर्देव आहे. ही राज्याच्या गृहविभागाची जबाबदारी आहे. अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. त्या अहमदनगरमध्ये बोलत होत्या.
त्याचबरोबर पुढे चाकणकर असं देखील म्हणाल्या की, छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त यांनी या घटनेची चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगला 48 तास म्हणजे दोन दिवसांमध्ये सादर करण्याची आपण सूचना दिलेल्या आहेत दोन दिवसाचा कालावधी उद्या संपेल,त्यानंतर आपल्याला समजेल नक्की यामध्ये काय कार्यवाही झाली आहे.
>छत्रपती संभाजीनगरच्या ओहर गावात पुन्हा राडा; तुफान दगडफेकीनंतर परिस्थिती नियंत्रणात
सुषमा अंधारेंचं नेमक प्रकरण काय?
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या बाबतीत शिवराळ भाषेचा वापर केला होता. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली असता पोलिसांनी याची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोागाता दरवाजा ठोठावला. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे पत्राद्वारे तक्रार केली होती.
सुषमा अंधारे आक्रमक झाल्या होत्या. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत शांत बसणार नाही. अशी भूमिका अंधारे यांनी घेतली होती. महिला आयोगाकडून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या पत्राची दखल घेण्यात आली. महिला आयोगाने संजय शिरसाटांचे सगळे व्हिडीओ पोलिसांकडून मागवून घेतले. हे सर्व व्हिडीओ तपासून महिला आयोग निर्णय घेणार आहे.हे व्हिडीओ तपासून महिला आयोग कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली.