छत्रपती संभाजीनगरच्या ओहर गावात पुन्हा राडा; तुफान दगडफेकीनंतर परिस्थिती नियंत्रणात

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 03 31 At 11.37.02 AM

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील राड्याची घटना ताजी असताना आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ओहर गावात दोन गटात तुफान राडा झाला आहे. गावात सध्या तणावाची परिस्थिती आहे. गावामध्ये मोठा CRPF जवानांचा आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा राडा अज्ञात कारणावरून झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु आता गावात शांतता आहे.

ओहर हे गाव छत्रपती संभाजीनगर शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. या गावात दोन गटात दगडफेक झाली. यामध्ये 8 ते 10 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात काल रामनवमी च्या दिवशी दोन गटात हाणामारी झाली. यानंतर दगडफेकीच्या बातम्याही समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही खासगी आणि पोलिसांच्या वाहनांना आग लावण्यात आली आहे. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करावा लागला होता.

Sambhajinagar Violence : संभाजीनगरात झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथील हाणामारीत. जमावाने वाहनांची नासधूस केली होती. या हिंसाचारात एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या 51 वर्षीय व्यक्तीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती मिळालेली नाही.

Tags

follow us