Chandrakant Khaire On Loksabha Result : छत्रपती संभाजीनगर लोकसभा (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha) मतदारसंघात शिंदे गटाचे उमदेवार संदीपान भुमरे Sandipan Bhumre) यांनी दणदणीत विजय मिळवला. भुमरेंनी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंचा (Chandrakant Khaire) 1 लाख 34 हजार 650 मतांनी पराभव केला. दरम्यान, आता चंद्रकांत खैरेंनी या पराभवाचं खापर अंबादास दानवे यांच्यावर फोडलं आहे. पक्षातीला काही लोकच आपल्या पराभवाला जबाबदार असल्याचं खैरे म्हणाले.
आम्हाला मान्य नाही, सरकारमध्ये राहुनही काम करता येतं; बावनकुळेंची फडणवीसांना साद
एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी 3 लाख 41 हजार 480 मते घेतली. तर खैरेंनी 2 लाख 93 हजार 450 घेतली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर चंद्रकांत खैरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पराभव होईल असे कधीच वाटले नव्हते. हा पराभव मनाला लागणारा आहे. आपण कधी भ्रष्ट्राचार केला नाही. निर्व्यसननी मानसाला मतदारांनी मत दिली नसल्यानं आपण दुखी झालोय, असं खैरे म्हणाले.
निवडणुकीतील यशासाठी Sonu Sood ने केलं एन. चंद्राबाबू नायडूंचे अभिनंदन!
ते म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे इथे मुक्कामी होते, त्यांनी काय घोळ केला माहिती नाही. संदीपान भुमरे यांनी 80 कोटी रुपये वाटप केले, काही लोक पैशांच्या मागे पडले. हा पैशांचा विजय आहे. धनशक्तीचा विजय आहे, असा आरोप खैरेंनी केला. मुख्यमंत्री चार दिवस शहरात होते. Evm मध्ये काही तरी झाले असेल असेही खैरे म्हणाले.
ते म्हणाले, पहिल्या फेरीत मी कधीच मागे नव्हतो, पण या वर्षी मी मागे राहिलो. आमचे दोन जिल्हाप्रमुख आहेत. त्यातले एक आहेत अंबादास दानवे. त्यांनी काम केलं पाहिजे होतं. निवडून आणण्याची जबाबदारी त्यांची होती. सर्वकाही मीच केलं पाहिजे होतं का? त्यांनी आपला मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी फिरालाय नको होतं, असं खळबळजनक वक्तव्य केलं. उद्धव ठाकरेंना सर्व काही सांगणार आहे, असंही खैर म्हणाले.
पुढं बोलतांना खैरे म्हणाले की, पुढील विधानसभा निवडणुक जिंकायची आहे. आता मी पक्षाचं काम करणार आहे. 106 जागा विधानसभेत निवडणुक आणायच्या आहेत, असं ते म्हणाले.
दरम्यान, या मतदारसंघात अंबादास दानवेंना तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पक्षाने त्यांना तिकीट न देता खैरेंना तिकीट दिलं. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील वाद मातोश्रीपर्यंत पोहोचला होता. आता पराभवानंतर पुन्हा एकदा खैरेंनी दानवेंवर पराभवाचं खापर फोडलं. त्यावर दानवे काय प्रत्युत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.