Download App

चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या, नाहीतर तुम्ही द्या; ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

  • Written By: Last Updated:

चंद्रकांत पाटील यांनी काल बाबरी मशीद भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाडली असं वक्तव्य केलं होत. त्यावरून (Uddhav Thackeray) ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की बाबरी मशीद शिवसैनिकांनीच पाडली. त्यांना ते पटत नसेल तर चंद्रकांत पाटील यांनी लालकृष्ण आडवाणी यांचा व्हिडिओ ऐकावा, तो माझ्याकडे आहे, अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली.

बाळासाहेबांचा एवढा अपमान आतापर्यंत कोणी केला नाही, तो या मुख्यमंत्र्यांना कसा सहन झाला? आता चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्या अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असं आव्हान त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिल.

‘राष्ट्रवादी’ला मोठा धक्का! राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

बिळातून उंदीर बाहेर आले

काल चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली. बाळासाहेब म्हणाले हे कसले नपुंसक नेतृत्व. आता एक एक बिळातून बाहेर येतायत. अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधानांनी हिंमत झाली नाही

एका बाजूला मोहन भागवत मशिदी मध्ये जात आहेत, ते कव्वाली ऐकणार आहेत. तर दुसरीकडे हे सांगत आहेत की बाबरी आम्ही पाडली. तर त्यांना नक्की काय म्हणायचं आहे. असंही ते यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मी जेव्हा अयोध्येला गेलो तेव्हा शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. राम मंदिरासाठी आम्ही कायदा करा असं म्हणत होतो पण पंतप्रधानांनी हिंमत झाली नाही शेवटी निकाल कोर्टाने दिला. असा टोला देखील त्यांनी लगावला.

Tags

follow us