Download App

उद्धव ठाकरेंना फोन करून समजावणार; ठाकरेंच्या टीकेवर चंद्रकांतदादांचा खुलासा

Chandrakant Patil : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले असून त्यांनी पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा गदारोळ शांत होत नसल्याचे पाहत चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केल आहे. पाटील यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवरून हा वाद सुरू झाला.

चंद्रकांत पाटील स्पष्टीकरण देताना म्हणाले, ‘माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता नेहमीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंबाबत श्रद्धा बाळगून आहे. त्याही मुलाखतीत मी हेच म्हटले होते. बाळासाहेबांमुळेच अनेक हिंदुत्वाच्या विचारांना चालना मिळाली. मुंबईकर असल्याने दंगली ज्या भागात व्हायच्या तेथेच मी राहायला होतो. बाळासाहेब ठाकरेंमुळेच मुंबईत हिंदू जिवंत राहिला. त्यामुळे असे विचार मनातही येणार नाही. असे तोंडातून कधीच बाहेर पडणार नाही. त्यांचे मी अनेकदा ऋणच व्यक्त केले आहे.’

Uddhav Thackeray : “मस्तीत बोलणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी….” बाबरी पाडल्याचा मुद्यावरून ठाकरे संतापले

‘आता बाबरी ढाचा पाडण्याचा मुद्दा सुरू आहे. अयोध्येत ही रामजन्मभूमी आहे हे प्रस्थापित करण्यासाठी आंदोलन 1983 पासून सुरू झाले. विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झाले. बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी या संघटनांच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू झाले. ढाचा पडला ती तिसरी वेळ होती. त्याआधी दोन वेळा अयोध्येच्या दिशेने कूच झाली होती आणि प्रत्येक वेळेला विश्व हिंदू परिषदेच्या नावाने झाली. त्यानंतर प्रत्यक्ष ढाचा पडताना मी त्या मुलाखतीतच म्हटले होते की हे शिवसेनेचे. हे शिवसेनेचे नाहीत असा भेद नव्हता. तर सगळे हिंदू होते.’

‘हे सगळेजण विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या बॅनरखाली होते. त्यामुळे शिवसेनेचा ढाचा पाडण्याचा संबंध होता तर तसे नाही. आनंद दिघेंनी मंदिर होण्यासाठी सोन्याची वीट पाठवली होती. बाळासाहेबांनी स्वतः याचे श्रेय घेतले होते. त्यामुळे बाळासाहेबांबद्दल चुकूनही अनादर व्यक्त करण्याचा प्रश्नच येत नाही.’

चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या, नाहीतर तुम्ही द्या; ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

‘मुद्दा असा आहे की प्रत्यक्ष ढाचा पडताना शिवसैनिक नव्हते का तर शिवसैनिक आणि गैर शिवसैनिक असे नव्हते तर ती प्रामुख्याने हिंदूंनी पाडली आणि नेतृत्व विश्व हिंदू परिषदेचे होते हा माझा म्हणण्याचा मुद्दा होता. बाबरी पाडताना संजय राऊत कुठे होते हा माझा मुख्य सवाल होता. यामध्ये चुकून सुद्धा बाळासाहेब ठाकरेंबद्दल अनादर करण्याचा मुद्दाच नाही. नेहमीच मी मातोश्रीच्या संपर्कात राहिलो. ज्यावेळी लहान होतो आणि मुंबईत दंगली व्हायच्या त्यावेळी बाळासाहेबांबरोबर राहण्याची आणि त्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. दंगलीनंतर पंधरा दिवस नारळवाडीत सुरक्षित ठेवयाचे’, असे पाटील म्हणाले.

 

 

Tags

follow us