Download App

मुस्लिम मतं कुणाला हवीय ? भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी महाविकास आघाडीला सुनावलं 

नागपूर :  गेल्या सात दिवस कसबा आणि चिंचवड मधील प्रचारात होतो. मतदार भाजपच्या बाजूने आहे. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून त्यांचा उमेदवार स्टंटबाजी करत आहे. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रचार संपल्यानंतर अशा पद्धतीने प्रचार सुरू ठेवण्याचा कारस्थान आहे. मात्र ते मतदारांवर पैसे घेतल्याचा आरोप करत आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) मंचावरून मुस्लिम मतदारांना कुठूनही या. मात्र, मोदी आणि संघाला पराभूत करा असे आवाहन करण्यात आले आणि त्यानंतर मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे, त्यामुळेच आजची स्टंटबाजी झाली, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केला.

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) काय म्हणाले हे मी पाहिलेलं नाही. हाडामासाचा कट्टर शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन बाळासाहेब यांच्या विचारावर काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला. सोबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासारखा नेता आहेच. त्यामुळे शिवसेनेच्या ५० आमदारांनी अगदी योग्य निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांची सत्ता कायम राहिली असती तर शिवसेनेचे अनेक आमदार पराभूत झाले असते, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिंकले असते आणि याच कारणामुळे सत्ता परिवर्तन झाला आहे.

जेव्हा देवेंद्र फडणवीस बोलतात ते विचारपूर्वक बोलतात पुराव्यानिशी बोलतात. ते काही बोलायचं म्हणून संभ्रम निर्माण करत नाही. ते असते ही कधीच बोलत नाही जे काही ते बोलले आहे ते सत्यच आहे. एखाद्या कुटुंबात जेव्हा मूल होत नाही. तेव्हा दुसऱ्याचा मुल आणून बारसा केला जातो. संभाजीनगर आणि धाराशिव या नामांतरण बद्दल ठाकरे गटाचा तसाच आहे. एवढे दिवस सत्ता गाजवली. तेव्हा नामांतरणाचा विचार केला नाही. मात्र सत्ता जात असताना अल्पमतात असताना कॅबिनेटमध्ये देखावा केला. असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

Supriya Sule : पूर्वी पोर न्यायची आता वडीलही भाजपवाले न्यायला लागलेत, बायकांनो सांभाळून राहा

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा आम्ही नामांतरण केल्याबद्दल अभिनंदन करतो. मोदीजी आहेत तो सब मुनकिन आहे. संभाजीनगर अशा नामांतरणाला एमआयएमचा आधीपासूनच विरोध होता. त्यांनी कितीही आंदोलन केले, तरी काही फरक पडत नाही. संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतरण झालेच पाहिजे होते. एवढ्या वर्षानंतर हा लढा संपला असून जनतेची इच्छा पूर्ण झाली आहे. आपले नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये जाऊ नये, म्हणून अजित पवार मध्यावधीची भाषा बोलत आहे.

ओवेसी जर उद्धव ठाकरेकडे जाणार नसतील तर ओवेसीकडे उद्धव ठाकरे जातील. ज्या समाजवादी पक्षाने रामचरित माणसं जाळलं, त्या सपाचे नेते उद्धव ठाकरेंना भेटायला गेले आहे. उद्धव ठाकरेंना काय म्हणावं, उद्धव ठाकरेंनी किती खालची पातळी गाठली आहे. मी शंभर टक्के सांगतो ओवेसी जरी यांच्याकडे नाही आला, तरी हे ओवेसीकडे जातीलच. उद्धव ठाकरे यांची एवढी वाईट स्थिती होईल, असं महाराष्ट्राने विचारही केलं नव्हतं. सत्तेच्या लालसे पायी उद्धव ठाकरे ओवेसीकडे जातील. अशी खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली.

Tags

follow us