Supriya Sule : पूर्वी पोर न्यायची आता वडीलही भाजपवाले न्यायला लागलेत, बायकांनो सांभाळून राहा
“जमाना खराब है..! पूर्वी काँग्रेसची पोर ते न्यायचे आता तर वडील भाजपवाले नेऊ लागले आहेत. बायकांनो सांभाळून राहा.” असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लगावला आहे.सुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथे जाहीर सभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपसह केंद्र आणि राज्यातील सरकारवर कडाडून टिका केलीय.
यावेळी भाजपवर टीका करताना त्या मानल्या की, जमाना खराब है..! पूर्वी काँग्रेसची पोर ते न्यायचे आता तर वडील भाजपवाले नेऊ लागले आहेत. बायकांनो सांभाळून राहा. मी तर लाल मिरचीची पावडर घेऊन फिरते. आलाच कोणी घ्यायला तर डोळ्यात मिरची टाकणार. असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा : गणपती बाप्पा रवींद्र धंगेकरांना सद्बुद्धी द्या..भाजप कार्यकर्त्यांकडून दगडूशेठ गणपतीला आरती…
खरा हिंदू कोण ?
“त्यांनी आसामला भीमाशंकर दिल असलं तरी मी आसामला भीमाशंकर देऊ देणार नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेना याना स्वतःला हिंदुत्ववादी म्हणायचा अधिकार नाही. आपली आत्मीयता असलेला ज्योतिर्गलिंग त्यांनी आसामला दिला. त्यामुळे आता ते खरे हिंदू कि मी खरी हिंदू हे तुम्हाला ठरवायचं आहे.” हे आता तुम्हाला ठरवायचं आहे. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.