रवींद्र धंगेकरांना बुद्धी द्या : भाजपची दगडूशेठ गणपतीला आरती…
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे पैसे पोलिसांकडून कार्यकर्ते वाटत आहेत, असा आरोप करून आज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ते उपोषण केलं. त्यानंतर पोलीस उपयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे.
दरम्यान, आचारसंहितेचा भंग करून धंगेकर पब्लिसिटी स्टंट करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आणि धंगेकरांना सद्बुद्धी द्यावी यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून दगडूशेठ गणपतीला आरती करण्यात आली आहे.
कसबा पोटनिवडणुकीच उद्या मतदान होणार आहे. 48 तासापूर्वीच प्रचार बंद झाला आहे. मात्र, पोलीसच भाजप कार्यकर्त्यांचे काम करत असून भाजपचा प्रचार केला जात आहे. तसेच पैसे वाटले जात असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे.
पुढे धंगेकर म्हणाले, माझ्याबरोबर माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो. माझ्या कार्यकर्त्यापैकीच एका कार्यकर्त्याला समर्थनगर पोलीस स्टेशनला नेत दमदाटी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी पोलिसांवर केला. पोलीसच जर भाजपाचे काम करत असेल, तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा?, असे मत त्यांनी व्यक्त केले.
kasba Bypoll : धंगेकरांच्या पायाखालची वाळू सरकलीय; भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका
दरम्यान, पोलिसांनी कारवाई करण्याच्या दिलेल्या आश्वासनानंतर धंगेकरांनी आपला आंदोलन मागे घेतल आहे. मात्र, भाजप कार्यकर्त्यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती करून धंगेकर यांना सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना करून खोचक टोला लगावला आहे. धंगेकर हे प्रत्येक निवडणुकीत स्टंट बाजी करतात. पराभव पुढे दिसत असल्यामुळे लोकांची सहानभूती मिळावी म्हणून हे आंदोलन करत आहेत. हा आचारसंहितेचा भंग असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. तसेच धंगेकरांनी केलेले आरोप सिद्ध करावेत, असे आव्हान भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी केलं आहे.
दरम्यान, आज सकाळपासूनच धंगेकरांनी केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच पळापळ झाली होती. अखेर दुपारी पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर धंगेकरांनी एक पाऊल मागे घेत आपला आंदोलन मागे घेतलं. आता उद्या प्रत्यक्ष मतदान होणार आहे. सुमारे महिन्याभरापासून संपूर्ण राज्याचे लक्ष भेटलेल्या कसबा मतदारसंघांमध्ये मतदान कसे पार पडतं हे महत्त्वाचे ठरणार आहे.