Chandrashekhar Bawankule : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव करत महायुतीने (Mahayuti) पुन्हा एकदा सत्तेवर दावा केला. महायुतीच्या या लाटेमध्ये महाविकास आघाडीसह काँग्रेसचा (Congress) धुव्वा उडाला. कॉंग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. यानंतर नाना पटोलेंसह (Nana Patole) मविआतील अनेक नेत्यांनी ईव्हीएम मशिनबाबत शंका उपस्थित केली. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) पटोलेंवर टीका केली.
अजितदादांना CM करा! फुकटचा सल्ला नकोयं, काकांचा पुतण्यावर पलटवार
पटोले केवळ 250 मतांनी विजयी झाले, त्यांनी मतदारसंघात काही विकासकामे केली असती, जनतेशी संपर्क ठेवला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असा टोला बावनकुळेनी लगावला.
पटोलेंनी आता चिंतन करावं…
बावनकुळेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ईव्हीएमबाबत होत असलेल्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत 31 खासदार निवडून आले तेव्हा काँग्रेसने ईव्हीएमवर शंका घेतली नाही. आता विधानसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर ते ईव्हीएमवर पराभवाचे खापर फोडत आहे. त्यापेक्षा पटोले यांनी आपण ईव्हीएममध्ये का पराभूत झालो आणि लोकांनी कॉंग्रेसला का नाकारले? याचे आत्मपरीक्षण करावं, चिंतन करावे, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला.
पुढं बावनकुळे म्हणाले की, ईव्हीएमध्ये नाना पटोले पराभूत झाले होते. पोस्टल मतांमुळे ते केवळ 250 मतांनी विजयी झालेत. त्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात काही विकासकामे केली असती, जनतेशी संपर्क ठेवला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. मी मुख्यमंत्री होणार असे ते सांगत होते. प्रचार सभांमधून आपल्या जिल्ह्यातील माणूस मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगून त्यांनी मते मागितली. त्याला काही लोक भूलले म्हणून ते निवडून आले.
आता कॉंग्रेसने चिंता करावी…
लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला होता तेव्हा आम्ही लगेच त्याचे आत्मपरीक्षण केले. आमचे कुठे चुकले, नागरिकांना काय हवे आहे, याचा अभ्यास केला. त्यानुसार योजना आखल्या. आम्हाला जनतेनी भरभरून दिले. महायुतीला 55 टक्के मते मिळाली. आघाडीला केवळ 32 टक्के मते मिळाली. याची चिंता कॉंग्रेसने करणे गरजेचं आहे, असं बावनकुळे म्हणाले.
पटोले म्हणाले, विधानसभेसोबत नांदेड लोकसभेची पोटनिवडणूकही घेण्यात आली. दोन्हीकडे ईव्हीएमवरच मतदान घेण्यात आले. नांदेडमध्ये आघाडीचा खासदार निवडून आला.. मात्र, आघाडीच्या एकाही नेत्याने ईव्हीएमवर संशय व्यक्त केला नाही. ज्या ज्या विधानसभा मतदारासंघात मविआचे आमदार निवडून आले, तेथील ईव्हीएम योग्य आणि पराभूत झालेल्या विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम मॅनेज केल्याचा आरोप कोणालाही पटण्यासारखा नाही, असं बावनकुळे म्हणाले.