Download App

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी दारोदारी फिरताहेत; चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी दारोदारी फिरत आहेत. ते कधी काँग्रेसकडे तर कधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जात आहेत -बावनकुळे

  • Written By: Last Updated:

Chandrashekhar Bawankule : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळं सर्व पक्ष जागावाटपाची चर्चा करत आहेत. तसेच राज्यात कोणाचे सरकार येणार आणि मुख्यमंत्री कोण होणार याबाबतही अटकळ बांधली जात आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) इच्छूक असल्याचं दिसतं. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

वन नेशन वन इलेक्शन लोकशाही अन् संघराज्याच्या विरोधात; मल्लिकार्जुन खर्गेंचा भाजपवर हल्लाबोल 

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी दारोदारी फिरत आहेत. ते कधी काँग्रेसकडे तर कधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जात आहेत, अशी बोचरी टीका बावनकुळेंनी केली.

चंद्रशेखर बावनकुळे बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोतलांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाची चढाओढ ही महायुतीमध्ये सुरू नसून खरी चढाओढ ही महाविकास आघाडीत सुरू आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असून ते कधी काँग्रेसकडे तर कधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जात आहेत. ठाकरे पदासाठी दारोदारी फिरत आहेत. दिल्लीत जाऊन त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांच्याकडेही त्यांनी स्वत: मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. दुसरीकडे ते शरद पवार यांच्याकडे स्वत: मुख्यमंत्रीपदाची मागणी करत आहोत, असं बावनकुळे म्हणाले.

वडगावशेरीनंतर चिंचवडमध्ये उलथापालथ! आमदार अश्विनी जगतापांच्या हाती तुतारी? 

महाविकास आघाडीत सीएम पदासाठी चढाओढ…
पुढं बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस पक्षात नाना पटोले यांच्यासारखे दहा नेते तयार झाले. त्यामुळे ते नेतेही मुख्यमंत्री आमच्याच काँग्रेसचाच असावा, असा हट्ट धरून आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी जी चढाओढ आहे, ती केवळ महाविकास आघाडीतच आहे. शरद पवारांना यांची त्यांच्या कन्येला मुख्यमंत्री करण्याची इच्छा आहे. त्यासाठी पवारांची मोर्चेबांधणी सुरू आहे, असंही बावनकुळे म्हणाले.

वर्ध्याच्या चारही जागांवर भाजपचा दावा

वर्धा विधानसभेच्या जागेवर उमेदवार कोण असा प्रश्न विचारला असता बावनकुळे म्हणाले की, वर्ध्याच्या चारही जागांवर भाजप दावा करणार आहे. मात्र मित्र पक्षाचा एखागा उमेदवार जर प्रबळ असेल तर त्या जागेवर तिन्ही पक्षात चर्चा करून ती जागा मित्र पक्षांसठी सोडण्याच येणार असल्याचं बावनकुळे म्हणाले.

follow us