Download App

तुम्ही तुमचा आकडा बघा, सुपडाचं साफ होणार; बावनकुळेंनी चव्हाणांना सुनावलं!

तुम्ही जरा तुमचा आकडा बघा, सुपडाचं साफ होणार असल्याचं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पृथ्वीराज चव्हाणांना सुनावलं.

Image Credit: Letsupp

Chandrashekhar Bawankule : तुम्ही जरा तुमचा आकडा बघा, राज्यात तुमचा सुपडाचं साफ होणार असल्याचं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Chandrashekhar Bawankule) यांना सुनावलं. देशात भाजप 203 पेक्षा अधिक जागा जिंकणार नसल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी केलायं. त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाणांना चांगलच सुनावलंय. ते मुंबईत बोलत होते.

Ghatkopar Hoarding Collapse नंतर सरकारला धडा; मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतील सर्व होर्डिंग्जच्या ऑडिटचे आदेश

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तुम्ही तुमचा आकडा बघा, राज्यात तुमचा सुपडा साफ होणार आहे. शरद पवार यांना माहितीये की बारामती हातातून जाणार आहे त्यामुळेच महाविकास आघाडीचा फुगा फुटलेला आहे. मोदींच्या वादळाने महाविकास आघाडी उडाली असल्याची सडकून टीकाही चंद्रशेखर बावनकुळेंनी केलीयं.

ईडीच्या भितीने राजजींनी पंतप्रधानांना ‘ते’ पत्र पाठवलच नाही; किरण मानेकडून पोलखोल

महाराष्ट्रामध्ये महायुतीला प्रचंड ताकद मिळत आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण जे बोलत आहेत ते त्यांच्या समाधानासाठी बोलत आहेत. ते एक गोष्ट बरोबर बोलले आहेत. 4 तारखेनंतर या महाराष्ट्रात तुम्हाला दोन पक्ष दिसणार नाही. दुसऱ्या दिवशी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी विलीनीकरणाची भाषा सुरु केली.

राहुल गांधींवर घणाघात अन् नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक,फडणवीसांची मुरबाडमध्ये सभा

पृथ्वीराज चव्हाण यांनी जे म्हणतात त्याचा सरळ अर्थ आहे की, महाराष्ट्र्रात 6 पक्ष आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादीला विलीनीकरण करावं लागणार असून त्यांच अस्तित्व संपणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्यावरून वाटतंय, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?
यंदाची निवडणूक लोकांनी हातात घेतली असून भाजपला बहुमताचा आकडा गाठणे कठीण दिसून येत आहे. भाजपला 272 चा आकडा गाठणे सध्या अवघड असल्याचं दिसतंय. मागील दोन निवडणुकीत भाजपने हा आकडा गाठला पण देशात सध्या भाजपविरोधात वातावरण असून त्याचा परिणाम म्हणून केंद्रात सत्ताबदल होणार असल्याचीही शक्यता पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलीयं. तर इंडिया आघाडीच्या 240 ते 260 जागा निवडून येणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

follow us

वेब स्टोरीज