ईडीच्या भितीने राजजींनी पंतप्रधानांना ‘ते’ पत्र पाठवलच नाही; किरण मानेकडून पोलखोल
Kiran Mane Criticize Raj Thackeray on Letter about Brij Bhushan Sharan Singh : अभिनेता किरण माने ( Kiran Mane ) याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या एका पत्राबाबत पोलखेल केली आहे. हे पत्र राज ठाकरे यांनी महिला कुस्तीगीरांनी ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्या ब्रिजभूषण शरण सिंहांबद्दल ( Brij Bhushan Sharan Singh ) पंतप्रधान मोदी यांना लिहिलं होतं. त्याबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट करत मानेने माहिती दिली.
Box Office: राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची विकेंडला जोरदार कमाई, आतापर्यंत कितीचा गल्ला जमवला?
या पोस्टमध्ये किरण मानेने लिहीलं आहे की, “महिला कुस्तीगीरांनी ज्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत त्या ब्रिजभूषणवर कारवाई करा.” अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांना पाठवले आहे असे राज ठाकरेंनी जाहीर केले होते. एक वर्षापूर्वी, ३१ मे रोजी सोशल मिडीयावर ते पत्र पोस्ट केले गेले. ते पत्र प्रचंड व्हायरल झाले होते. “ब्रिजभूषणला आम्ही मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही.” असा इशाराही दिला होता.
हा स्टंट असणार असा संशय काहीजणांना आला. ईडीच्या भितीने घाबरलेले राजजी हे धाडस करणार नाहीत अशी बर्याचजणांना खात्री होती. शेवटी माहितीच्या अधिकारात एकाने याविषयी अर्ज करून विचारणा केली. पंतप्रधान कार्यालयाकडून असे उत्तर आले की, “राज ठाकरे यांच्याकडून असे कुठलेही पत्र पंतप्रधान कार्यालयाला आलेले नाही.”
Happy Birthday : एमबीबीएस, मिस वर्ल्ड अन् अभिनेत्री; मानुषीच्या प्रेरणादायी प्रवासाची झलक
केवढी मोठी चालबाजी होती ही, सुषमा अंधारेताईंनी काल अणुशक्तीनगर येथे हा पर्दाफाश केला तेव्हा मी तिथे हजर होतो. उपस्थित प्रचंड जनसमुदायातून “शेSSSम शेSSSSम” असा खुप मोठा आवाज येऊ लागला… लोकांना मनापासून या फसवणुकीचे वाईट वाटलेले दिसले. राजकीय नेत्यांनी कायम एक लक्षात ठेवावे. एकवेळ तुम्ही निष्क्रिय असा, जनता खपवून घेईल… पण खोट्या भूलथापा देऊन जनतेच्या भावनांशी खेळू नका. आधीच या देशातले सर्वसामान्य नोकरदार, छोटे व्यावसायिक, गोरगरीब मजूर, शेतकरी, कष्टकरी आणि महिला नाडले गेलेले आहेत… जगणं हराम झालंय… त्यात तुम्ही असा थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका, बस. असं म्हणत किरण मानेने राज ठाकरे यांनी महिला कुस्तीगीरांनी ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्या ब्रिजभूषण शरण सिंहांबद्दल पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं होतं. त्याची पोलखोल केली आहे.
दरम्यान महिला कुस्तीगीरांनी ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्या ब्रिजभूषण शरण सिंहांबद्दल पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं होतं. तसेच त्यावेळी राज यांनी ब्रिजभूषण यांना मुंबईत येऊ देणार नाही. असा पवित्रा देखील घेतला होता. मात्र आता त्याच राज ठाकरे यांनी भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. तसेच त्यांनी अशा प्रकारे कोणतही पत्र पंतप्रधानांना लिहिलं नव्हत असंही माने यांनी सांगितलं आहे.